Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात “ऑलवेज केअर” प्राणी हायटेक रुग्णवाहिकेचे उद्घाटन


सोलापूर : परम पूज्य नम्रमुनी गुरुदेवां च्या आशीर्वादाने अर्हम युवा सेवा ग्रुपच्या वतीने “ऑलवेज केअर” प्राणी हायटेक रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन गुरुवार,दि. ५ मार्च २०२६ रोजी जैन स्थानक,सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नमोकार महामंत्रांनी झाली.





या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त वीणा पवार,प्राणी व पशुवैद्यकीय विभागाचे कंट्रोल ऑफिसर तपन डंके,एसएमसी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चौगुले, महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळाचे सदस्य केतन शहा तसेच अर्हम युवा सेवा ग्रुप,मुंबईचे सेंट्रल टीम हेड धवल मेहता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 



सहाय्यक आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्राणी हायटेक रुग्णवाहिकेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्हम युवा सेवा ग्रुपने मागील नऊ महिन्यांमध्ये केलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांचा आढावा प्रोजेक्टर द्वारे सादर करण्यात आला. त्यानंतर “ऑलवेज केअर” प्राणी हायटेक रुग्णवाहिका उपक्रमाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.



“ऑलवेज केअर” संस्थेमार्फत देशभरात ३८  प्राणी हायटेक रुग्णवाहिका कार्यरत असून,आतापर्यंत १.३ लाखांहून अधिक प्राण्यांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या १५ पेक्षा अधिक शहरांमध्ये ही सेवा कार्यरत आहे. सोलापूर शहरात जखमी,आजारी व अपघातग्रस्त प्राणी व पक्षी त्यांना   तातडीने मदत व उपचार मिळावेत हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांसाठी २४x७ हेल्पलाइन क्रमांक ६२६२०९०९१२ उपलब्ध करण्यात आला असून रुग्णवाहिका सेवा सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. अनुभवी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून औषधोपचारासह सेवा विनामूल्य दिली जाणार आहे.



या उपक्रमामागे कार्यरत असलेल्या “ ऑलवेज केअर”च्या कोर कमिटीमध्ये तन्वी अवलानी,मोक्षा देढिया,केतन पोखरणा,शर्वरी श्रॉफ,जमीर श्रॉफ,श्वेता देसाई,उत्सवी अवलानी,रिकिता शहा,आशिष छाजेड, हेतल अवलानी आणि महेश दळवी यांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान याच दिवशी बचाव करण्यात आलेल्या श्वानाच्या अनाथ पाच पिल्लांना दत्तक देण्याचा उपक्रमही पार पडला. या प्रसंगी अनेक दानदात्यांनी पुढाकार घेत देणगी जाहीर करून मुक्या प्राण्यांच्या जीवदयासाठी मोलाचा आधार दिला. 




 
श्वेतांबर मूर्ती पूजक संघातर्फे इंदरमल जैन,दिगंबर समाजातर्फे सुनील गांधी,तेरापंथी समाजातर्फे कैलास कोठारी आणि स्थानकवासी समाजातर्फे पदम राका,जेसजी सेंट्रल चे संजय शहा हे व्यासपीठावर विराजमान होते. सोलापूरमधील या रुग्णवाहिका सेवेचे व्यवस्थापन जैन समाजाच्या युवा युवती तर्फे करण्यात येणार असून नागरिकांनी देणगी देऊन या सेवाभावी उपक्रमाला सहकार्य करावे तसेच ह्या रुग्णसेवेचा लाभ सर्व सोलापूर करानि घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.