Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात ‘लुई ब्रेल बहुउद्देशीय सामाजिक संस्थे’ तर्फे महिला शक्तीचा जागर; राज्यभरातील १०० हून अधिक महिलांचा सहभाग


सोलापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ‘लुई ब्रेल बहुउद्देशीय सामाजिक संस्थे’तर्फे सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात रविवारी (दि.२२ मार्च २०२६) भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात महाराष्ट्रभरातून १०० हून अधिक महिला पदाधिकारी व सदस्य सहभागी झाल्या असून महिला शक्तीचा प्रभावी जागर घडून आला.

विविध स्पर्धांनी रंगला सोहळा महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी गायन,काव्यवाचन व उखाणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली. उखाण्यांमधून पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले,तर गायनाने कार्यक्रमात रंगत आणली.


उत्कृष्ट नियोजन आणि आतिथ्य - बाहेरगावाहून आलेल्या महिलांसाठी निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. वर्षा गिरीश बलदवा यांनी भोजन व्यवस्थापन, तर ज्योती केतन शहा (भाभी) यांनी निवासाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नियोजनबद्ध कामगिरीबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती - या कार्यक्रमाला राज्य व जिल्हास्तरावरील पदाधिकारी उपस्थित होत्या. राज्य महिला उपाध्यक्ष रीना पाटील,राज्य सचिव संतोषी भाभी, कार्यकारिणी सदस्य लता गायकवाड व अंजली शेळके यांची उपस्थिती होती. तसेच नाशिकच्या अलका माठाले, अहमदनगरच्या मंगल भागवत,पुण्याच्या सीमा पोकले व कोल्हापूरचे बसीर शेख यांनीही सहभाग घेतला. विशेष अतिथी म्हणून उद्योजक शांताबाई पुरापाटी,व्हाईस कॅप्टन गंगा कदम,डॉ.मंजुषा शहा व डॉ.श्रद्धा पांढरे उपस्थित होत्या.



यशस्वीतेसाठी सदस्यांचे योगदान - रिंपल खुशाल देढिया, विनोदा करमपुरी, लावण्या पाटील व पल्लवी भालशंकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन व आभार - कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केले,तर आशा पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. शेवटी संस्थेचे अध्यक्ष सुरज सोनटक्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.