११ एप्रिल रोजी सोलापुरात होणाऱ्या साहित्य संमेलन अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस
सोलापूर : कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड यांच्या वतीने ११ एप्रिल रोजी सोलापुरात होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची निवड झाल्याची घोषणा अध्यक्ष ॲड.बी.आर.कलवले डॉ.लक्ष्मण कार्लेकर यांनी केली.
सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी, साडेदहा वाजता उद्घाटन सोहळा,दुपारी परिसंवाद ,कथाकथन,निमंत्रित व नवोदितांचे कवी संमेलन आणि सायंकाळी सांगता समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याचवेळी संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाकरिता वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात येत आहेत.
संमेलनानिमित्त आयोजित बैठकीत प्राचार्य डॉ.माधव गादेकर (लातूर) हभप विठ्ठलराव माने,उत्तमराव वाघमोडे लक्ष्मण भोसले,डॉ.प्रा.दशरथ रसाळ,दत्तात्रेय इंगळे,पत्रकार भरतकुमार मोरे,महिला प्रमुख राजश्री जाधव,श्रीकांत बोराडे, प्रा.मारुती घंटेवाड,रमेश लोंढे अशोक खानापुरे,सुनील पुजारी,प्रा.मुक्तेश्वर मुळे,कवी नागनाथ गायकवाड,प्रा,दस्तगीर जमादार,महंमद इंडीकर,प्रा.नरेंद्र गुंडेली,अशोक मम्हाणे, सुरेश पाटोळे सुनील क्षीरसागर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
चौकट -पुस्तक प्रकाशन आणि सत्कार
या संमेलनात सोलापूर व राज्यभरातील कवी लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. तसेच सामाजिक शैक्षणिक साहित्य विधि वैद्यकीय पत्रकारिता, व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
चौकट - अभिनवपुस्तक विक्री केंद्र
या संमेलनात पुस्तक विक्री केंद्र उभारली जाणार आहेत. आपली प्रकाशित झालेली पुस्तके,कवी लेखकांनी संमेलनाच्या स्थळी आणून विक्रीस उपलब्ध करावीत.
चौकट - लक्षवेधक ग्रंथ दिंडी
या संमेलनात लक्षवेधक ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे .
पारंपारिक रितीरिवाजा उजाळा देण्याकरिता पोतराजापासून ते ज्ञानराजापर्यंत वेशभूषा परिधान केलेले युवक,युवती, महिला,पुरुष हे या ग्रंथदिंडीचे आकर्षण असणार आहेत.
