Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरला जाज्वल्य पत्रकारितेचा इतिहास : डॉ. सचिन ओम्बासे


महापालिकेतर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान 

सोलापूर : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सोलापूरला जाज्वल्य पत्रकारितेचा इतिहास असून ही परंपरा जोपासण्याचे काम पत्रकारितेमधील विद्यमान पिढीकडून होत आहेत,असे गौरवोद्गार महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले. 




             
पत्रकार दिनानिमित्त सोलापूर महापालिकेच्यावतीने आयोजित - पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. 
या कार्यक्रमात आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार,उपायुक्त आशिष लोकरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महापालिका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांचा सत्कार करण्यात आला.



       
प्रास्ताविक भाषणात अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी पत्रकारितेचे महत्त्व विशद केले. सोलापूरचे नागरी व इतर प्रश्न सोडवण्यात तसेच सोलापूरच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे. महापालिका प्रशासनाला पत्रकारांकडून नेहमीच चांगली साथ लाभत आली आहे,असे त्या म्हणाल्या.

         
याप्रसंगी विविध वृत्तपत्र व वाहिन्यांच्या पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष किरण बनसोडे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी गेल्या ३४९ दिवसांमध्ये केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार,राजपाल जेटीथोर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.