"सोलापूरकर एकवटले" - सोलापूर, दि. ३१ जानेवारी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम,अभ्यासू व विश्वासार्ह नेतृत्वाला संधी मिळावी या उद्देशाने केतन महेंद्र शहा यांची सोलापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात यावी,अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. याबाबत भारतीय जनता पक्षाचे जयकुमार गोरे,ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे नूतन जिल्हा पालकमंत्री आणि भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या कडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.
शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० स.वाजता बालाजी सरोवर,आसरा चौक येथे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे निवेदन देण्यात आले. शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी असलेले,सुशासनाला प्राधान्य देणारे, जनतेच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण व प्रभावी काम करणारे तसेच सर्व समाजघटकांमध्ये विश्वास निर्माण केलेले नेतृत्व महानगरपालिकेत असणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
केतन शहा यांनी सामाजिक व जनहिताच्या विविध विषयांवर सातत्याने कार्य केले असून शहराच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांचे योगदान उपयुक्त ठरेल,असेही ते २९ संस्थे मध्ये ऑनररी सेवा देत आहेत,असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. सोलापूरला सक्षम प्रतिनिधित्व मिळावे आणि विकासकामांना बळ मिळावे या भावनेतून ही मागणी करण्यात आले.
सोलापूरच्या विमानसेवे साठी,आय टी पार्क साठी,गोरक्षणा साठी,ग्रामीण पाण्यासाठी,बहुजन समाजाच्या शिक्षणा साठी,नवीन उद्योग व रोजगार साठी,, “विकासासाठी, विश्वासासाठी आणि सशक्त सोलापूरसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे,वेळप्रसंगी लढले सुद्धा पाहिजे” असा संदेश यावेळी देण्यात आले.
या प्रसंगी विविध क्षेत्रांतील नागरिक,कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. ९४ वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास शहा (प्राणी मित्र) हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी लेखी इतर संस्थे च्या शिफारशी सोबत त्याचे सुद्धा पत्र दिले व मागणीला पाठिंबा दर्शवला.
ह्या प्रसंगी विविध संस्थे चे सभासद उपस्थित होते. जैन सोशल ग्रुप सेन्ट्रल साज संजय शहा,संतोष बंब,सुदर्शन गांधी कामिनी गांधी,संजय पटवा,पार्क रोड शोरूम्स असोसिएशनचे सुरेंद्र जोशी,उमेश ऎनापूर,शाम क्षीरसागर,लाडले साहेब शेख,प्रसाद देवस्थळी,अग्रवाल,नजीर शेख,महाराष्ट्र चेम्बर चे संजीव पाटील,राजीव देसाई,दिगंबर जैन समजा तर्फे सुनील गांधी,राजकुमार कोठडीया,अरविंद शहा,जयजीत पटवा,साहिल शहा,अजित शहा,लौकिक शहा,गोशाळे तर्फे कुलकर्णी मॅडम,शुभंम साठे,रुद्रप्पा बिराजदर,सोलापूर विकास मंच तर्फे विजय यादव,योगीन गुज्जर,अंबुरे वकील,मनोज क्षीरसागर,प्रशांत झाम्बरे,सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर अससोशिएशन तर्फे डॉ.सुरजरतन धूत,ईश्वर मालू,भूषण भुतडा,कौशिक शहा,सुयोग्य कालानी,सर्वोदय सोसायटी तर्फे शिरीष कोठावळे,सचिन जोग,डॉ.सुनील मेहता,ई १०० पेक्षा जास्त सुशिकीत पुरुष व महिला उपस्थि होते.
