Ticker

6/recent/ticker-posts

एसीबीची मंत्रालयात मोठी कारवाई...



मुंबई : महाराष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात एसीबीने मोठी कारवाई केली आहे. थेट मंत्रालयात ही कारवाई करण्यात आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सापळा रचून अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारकूनास अटक केली आहे. राजेंद्र ढेरंगे असे कारकूनाचे नाव आहे. आरोपी राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले आहे.


तक्रारदाराच्या मेडिकल स्टोअरचा परवाना निलंबन करण्यात आला होता. ही निलंबन कारवाई रद्द करण्यासाठी राजेंद्र ढेरंगे यांनी ५० हजार रुपये लाच मागितली होती. याबाबतची तक्रार प्राप्त होताच एसीबीने पडताळणीनंतर सापळा रचला त्यात ढेरंगे सापडले. 





त्यांचे कार्यालय आणि निवासस्थानी एसीबीकडून शोधाशोध सुरू आहे. याबाबत ढेरंगे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अशी माहिती एसीबीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.