सोलापूर : (निधन वार्ता) दत्त नगर येथील प्रसिद्ध हातमाग उद्योजक सुदर्शन सत्तया कुरापाटी यांचे गुरुवार,दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दुपारी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान श्री. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,दोन मुली,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. मास लॉ असोसिएट्सचे संस्थापक तसेच जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मोहन कुरापाटी यांचे ते वडील होत.
सुदर्शन कुरापाटी हे हातमाग उद्योग क्षेत्रातील एक प्रामाणिक, कष्टाळू व समाजात आदरयुक्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. आज रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
