Ticker

6/recent/ticker-posts

प्रेमसंबंध प्रियकरास न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर...

पाँक्सो कायद्यांतर्गत-अल्पवयीन पिडीते-सोबत प्रेमसंबंध प्रियकरास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर...

सोलापूर : अल्पवयीन मुलीचा अज्ञात पणाचा फायदा घेऊन आई-वडिलांच्या रखवालीतून तिला फुस लावून घेऊन गेल्याचे आरोपातून आरोपी सुमित हरि भोई (रा.बेगमपूर.ता-मोहोळ) याच्या विरुद्ध कामती पोलीस स्टेशन येथे गुन्हे क्रमांक -३९४/२०२५णअंतर्गत भारतीय न्याय संहिता चे कलम ६४(१),८७,१३७(२) तसेच (Pocso) बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ४,८,१२ प्रमाणे दि- १५/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. सबब प्रकरणात पिडीताही दि-१४/१२/२०२५ रोजी आरोपी सुमित भोई याच्या प्रलोभनाला बळी पडून त्यासोबत निघून गेली होती व आरोपीने आपण लग्न करू असे तिला सांगितले होते. तदनंतर आरोपीने पिडितेस पुढील ४ दिवस आपल्या सहवासात ठेवले होते आणि अत्याचार केले असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.


 दि. १८/१२/२०२५ रोजी आरोपीने पिडीतेला तिच्या घरी सोडले होते. परंतु पिडीत ही अज्ञान असून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन केलेल्या अत्याचाराबाबत तिने आपल्या घरच्यांना माहिती दिली व आरोपीने तिस कशाप्रकारे विविध प्रलोभने दिली होती व पिडिता ही त्यास कशी बळी पडली होती याचा उल्लेख सदरच्या फिर्यादीत नमूद होता. गुन्हा दाखल होतास सदर प्रकरणात आरोपींनी आपलं अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. मेहरबान न्यायालयास आरोपीच्या वकिला मार्फत असा युक्तिवाद करण्यात आले  की आरोपी व फिर्यादी यांची प्रेम-प्रकरण असून त्यातून ही घडलेली ही घटना आहे. तसेच एका गल्लीतील रहिवासी असल्याकारणाने एकमेकांच्या कुटुंबीयांना देखील सदरची बाब ही ज्ञात आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन. सुरवसे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज दिनांक १०/०२/२०२६ रोजी ‌सशर्त मंजूर केला आहे. 


या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड‌.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनीष बाबरे,ॲड.रोहित थोरात, ॲड.अजय वाघमारे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ‌ॲड.बागल यांनी काम पाहिले.