Ticker

6/recent/ticker-posts

महापौर व उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियाची कार्यालये व सभागृहांची पाहणी...



सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत उद्या होणाऱ्या नूतन महापौर व उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर दिनांक ०५ फेब्रुवारी गुरुवार रोजी महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी संबंधित कार्यालये व सभागृहांची पाहणी केली.





यावेळी आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी महापौर कार्यालय, उपमहापौर कार्यालय,सभागृह नेते कार्यालय तसेच यशवंतराव चव्हाण सभागृह येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. उद्या होणाऱ्या निवड प्रक्रियेची तयारी,व्यवस्था,बैठक नियोजन,सभागृहातील आसन व्यवस्था,सुरक्षा व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला.



महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पडणार आहे,कायदेशीर तरतुदी,नियमावली तसेच निवड प्रक्रियेदरम्यान घ्यावयाच्या दक्षता याबाबतची सविस्तर माहिती मानधनावर असलेले नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडून आयुक्तांनी घेतली. निवड प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पडावी,यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



या पाहणी प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे,नगर अभियंता सारिका आकूलवार,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी,प्रकाश दिवानजी,युवराज गाडेकर,महादेव इंगळे,रजाक पेंडारी,नितीन गायकवाड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





महापालिकेच्या लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या निवड प्रक्रियेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक त्या सुविधा व व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात,असेही आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले.