Ticker

6/recent/ticker-posts

रिव्हॉल्वर व तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचं प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेतील ‌३ आरोपीस जामीन मंजूर.

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय : रिव्हॉल्वर व तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचं प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेतील ‌३ आरोपीस जामीन मंजूर.
      
सोलापूर : अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे दि.२९/०९/२०२५ रोजी गुन्हे क्रमांक-५३४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,१२६(२) व ३(५) आणि शस्त्र अधिनियम, १९५९ कलम ३,४,२५ अन्वये यातील आरोपी सचिन राठोड(रा. मुळेगाव तांडा),आकाश चव्हाण (रा. वडजी तांडा) व अविनाश राठोड(रा. बक्षी-हिप्परगा तांडा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.


      
संभाजीनगर येथील राणा शिपिंग कंपनीचे चेअरमन उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर दि.२८/०९/२०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अक्कलकोट येथून देवदर्शन करून संभाजीनगरला परत जाण्याकरिता सोलापूर मार्गे जात असताना त्यांची रेंज-रोवर कार याचा पाठलाग करत यातील आरोपींनी आपल्या पांढऱ्या रंगाची बोलेरो जीपच्या मदतीने २ किलोमीटर पर्यंत पाठलाग केला होता. तसेच पुढे काही अंतरावर आरोपींनी बोलेरो गाडीचा वेग कमी करून,त्यातील एक आरोपीने उद्योगपती राणा यांना रिवाल्वर दाखवली होती व दुसऱ्या आरोपीने तलवार दाखवीत धमकावले होते. 





आरोपींनी आपली गाडी ही उद्योगपती राणा यांच्या गाडीसमोर लावून थांबवली होती तसेच त्यांच्या हातातील तलवार घेऊन ते ड्रायव्हर सीटवर बसलेले राणा यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करत होते. तदनंतर आरोपीने दरवाजा अनलॉक करण्याचा प्रयत्न केला आणि तुझ्या डोक्यात तलवार घालून तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून त्यांच्यावर तलवार उगारली होती. सदर उद्योगपती यांच्या संरक्षणासाठी नेमलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील हे गाडीतून खाली उतरले होते व त्यावेळी कर्मचाऱ्यांना पाहून आरोपींनी तेथून पळ काढला होता. त्यातून पकडून ठेवलेले एका आरोपीचे नाव सचिन राठोड असे होते व त्याच्याकडून इतर आरोपींना बद्दल माहिती पोलीस तपासात प्राप्त झाली होती. अटके नंतर आरोपींनी आपला जामीन अर्ज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी.राजवैदय यांनी आरोपींचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.
       ‌ 
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनीष बाबरे,ॲड.रोहित थोरात, ॲड.अजय वाघमारे यांनी काम पाहिले तसेच सरकारतर्फे ॲड.रामपुरे यांनी काम पाहिले.