Ticker

6/recent/ticker-posts

नामनिर्देश ३१६ अर्ज दाखल तर ३८३७ नामनिर्देशन अर्ज विक्री


सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५
 
सोलापूर : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक २३-१२-२०२५ मंगळवार रोजी पासून नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात येत असून दिनांक २९-१२-२०२५ सोमवार रोजी पर्यंत एकूण ३८३७ नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आले.


नामनिर्देश अर्ज स्वीकारण्याची - दिनांक २३ ते २९ डिसेंबर सोमवार पर्यंत एकूण ३१६ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात झाले आहे.

१) निवडणूक अधिकारी-१ एकूण प्राप्त अर्ज-७१ प्रभाग व जागा
१अ-२  १ब-१ १क-१  १ड-८.
२अ-४  २ब-४ २क-२ २ड-६. 
३अ-६ ३ब-४  ३क-५  ३ड-७.
४अ-१  ४ब-६ ४क-८ ४ड-६.

२) निवडणूक अधिकारी-२एकूण प्राप्त अर्ज-५०
प्रभाग व जागा

५अ-२ ५ब-४ ५क- ६ ५ड -६
६अ -४ ६ब-५ ६क-४ ६ड-४
७अ-१ ७ब-३ ७क-२ ७ड-१
१५अ-१ १५ब-१ १५ क-२ १५ड-४.

३) निवडणूक अधिकारी-३एकूण प्राप्त अर्ज-४४
प्रभाग व जागा.

८अ-४ ८ब-२ ८क-४ ८ड-३.
९अ -५ ९ब-७ ९क-३ ९ड-८.
१४अ-० १४ब-२ १४क-१ १४ड-५.


४) निवडणूक अधिकारी-४ एकूण प्राप्त अर्ज-३१
प्रभाग व जागा.
१०अ-० १०ब-१ १०क-२ १०ड-२.
११अ-३ ११ब-३ ११क-१ ११ड-६.
१२अ-१ १२ब-० १२क -१ १२ड-१.
१३अ-३ १३ब-४ १२क-१ १३ड-२.

५) निवडणूक अधिकारी-५ एकूण प्राप्त अर्ज-५२
प्रभाग व जागा.

१६अ-३ १६ब-१ १६क-४ १६ड-३. 
१७अ-३ १७ब-४ १७क-५ १७क -६.
१८अ -२ १८ब-१ १८क-३ १८ड-३.
२१अ-४ २१ब-५ २१क-२ २१ड-३.

६) निवडणूक अधिकारी-६ एकूण प्राप्त अर्ज-३३ प्रभाग व जागा.

१९अ-२ १९ब-५ १९क ५ १९ड-५.
२०अ-३ २०ब-० २०क-२ २०ड-०.
२५अ-३ २५ब-३ २५क-५.

७) निवडणूक अधिकारी-७एकूण प्राप्त अर्ज-३५
प्रभाग व जागा

२२अ -४ २२ब-१ २२क-० २२ड-३.
२३अ-६  २३ब-१ २३क-३ २३ड-७.
२४अ-१ २४ब-० २४क-१ २४ड-४.
२६अ-३ २६ब-१ २६क-०.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरताना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी निर्गमित केलेल्या आदर्श आचारसंहिता व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.




महानगरपालिकेकडून आवश्यक असलेली ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) व इतर अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता करून विहित कालमर्यादेत नामनिर्देशन अर्ज सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले. नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे,अर्ज छाननी,उमेदवारी अर्ज माघार व मतदान प्रक्रिया या सर्व बाबी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार आहेत. यासंबंधीची सविस्तर माहिती वेळोवेळी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.