Ticker

6/recent/ticker-posts

घोडे बाजाराचे उद्घाटन सोळा संपन्न

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती,अकलूज यांच्या वतीने आयोजित घोडे बाजाराचे उद्घाटन २३ ऑक्टोबर गुरुवार रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते तसेच ज्येष्ठ नेते जयसिंह (बाळदादा) मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. 


या घोडे बाजारामुळे स्थानिक शेतकरी,व्यापारी यांना आपल्याच भागात सोयीचे ठिकाण. उपलब्ध झाले आहे. या व्यवसायासाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आले.


यावेळी मदनसिंह मोहिते-पाटील (चेअरमन,कृषी उत्पन्न बाजार समिती), खा.धैर्यशील मोहिते-पाटील,आमदार उत्तमराव जानकर,शिवतेजसिंह मोहिते-पाटील,सयाजीराजे मोहिते-पाटील,मामासाहेब पांढरे,सचिव राजेंद्र काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.