Ticker

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत ४८ टन कचरा संकलित...

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिवाळी सणानिमित्त शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतेचे विशेष अभियान राबविण्यात आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मधला मारुती चौक,कोतम चौक,७० फूट रोड, रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल्स उभारण्यात आले होते. या ठिकाणी सणानंतर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेकडून तत्काळ स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली.



महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत आज सकाळपासून या सर्व भागांमध्ये कचरा संकलनाचे काम हाती घेण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व रस्त्यांची पूर्ण स्वच्छता करून घेण्यात आली असून, एकूण ४८ टन कचरा संकलित करून उचलण्यात आला आहे.



या उपक्रमात - घन कचरा विभागाचे सह.आयुक्त शशिकांत भोसले  यांच्या अधिपत्याखाली मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक,सफाई कर्मचारी कर्मचारी तसेच यंत्रणा यांनी मनापासून सहभाग नोंदविला. महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणा खाली हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.



आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,दिवाळीनंतर निर्माण होणारा कचरा रस्त्यावर न टाकता निर्धारित ठिकाणी देऊन स्वच्छतेस सहकार्य करावे. सणाचा आनंद घेत असतानाच स्वच्छ सोलापूर घडविण्यात प्रत्येक नागरिकाने हातभार लावावा,असेही त्यांनी सांगितले.