Ticker

6/recent/ticker-posts

मेधा ताईना हिरव्या रंगाची ऍलर्जी आहे का?

मेधा ताई तुम्ही अगोदर भाजपच्या झेंड्यातुन हिरवा रंग काढून टाका

मेधा ताई तुम्ही पेंटर आहात का?

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश सचिव विद्या लोलगे यांनी शनिवार वाडा प्रकरणावरून खासदार मेधा कुलकर्णी यांना टोला लगावला आहे. मेधा ताईन हिरव्या रंगांची ऍलर्जी आहे का असा सवाल उपस्थित विद्या लोलगे यांनी उपस्थित केला आहे. हिरव्या रंगाची इतकी ऍलर्जी असेल तर भाजपच्या झेंड्यातुन हिरवा रंग काढा,तुमच्या केंद्रीय समितीकडे तसा अर्ज करा आणि भाजपच्या झेंड्यातुन हिरवा रंग काढा.




प्रसाद लाड तुम्ही मुळचे राष्ट्रवादी मधील - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्या लोलगे यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. प्रसाद लाड यांनी हिरव्या रंगा बाबत विधान केले होते. त्यावर विद्या लोलगे यांनी उत्तर दिले आहे. प्रसाद लाड याना सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर पाठवले होते. आता त्यांना मंत्रीपद हवं म्हणून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत आहेत."