सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात धोतरवाला आणि दाडीवाला एकत्र येण्याच्या तयारीत
या जोडगोळीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात लय कुटाणे केलेत
सोलापूर : सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात धोतरवाला आणि दाडीवाला एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. धोतरवाला भ्रष्ट कर्मचारी येण्याअगोदर अनेक डॉक्टरांना कॉल करून अप्रत्यक्ष धमकावत आहे,मी बॉम्बे नर्सिंग किंवा पीपीएनडीटी टेबल घेणार आहे. धोतरवाला कर्मचारी सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात यावं आणि मोठी कमाई व्हावी यासाठी दाडीवाला कर्मचारी मोठी उठाठेव करत आहे. नवीन आलेल्या सिव्हिल सर्जन मॅडम साहेबांना ही जोडगोळी येड्यात काढून प्रतिनियुक्तीचे आदेश काढण्याच प्रयत्न करत आहे.सिव्हिल सर्जन कार्यालयातील या दाडीवाल्या कर्मचाऱ्याने कोट्यावधी रुपयांचा बंगला देखील खरेदी केला आहे.
सिव्हिल सर्जन कार्यालयात - दाडीवाल्याने धोतरवाल्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. या दोघा जोडगोळीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात मोठे कुटाणे केलेत म्हणे. या जोडगोळीने भ्रष्टाचाराचा डब्बा उघडकीस येईल या भीतीपोटी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय जाळून टाकलं होतं असंही म्हटलं जातंय,पण आगीच नेमकं कारण अद्यापही समजू शकले नाही. शॉर्ट सर्किट असे सांगितले जात आहे. मात्र या जोडगोळीने पेटवून दिले अशीही कुजबुज त्यावेळी होती.ही जोडगोळी सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात एकत्र काम केली तर भविष्यात इथं पण आग लागू शकते.
दाडीवाल्याने सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात बेकायदेशीर पद्धतीने वरीष्ठ लिपिक असे प्रमोशन घेऊन 2021 पासून कामास सुरुवात केली आहे.पुणे येथील वरीष्ठ कार्यालयाने 2008 सालच्या बॅच मधील कर्मचाऱ्यांना डावलून 2017 सालच्या कनिष्ठ लिपिकांना कसे काय प्रमोशन दिले हा संशोधनाचा विषय आहे. 2017 सालचे कनिष्ठ लिपिक आजही खितपत पडले आहेत. 2008 च्या कर्मचाऱ्यांना डावलून 2017 च्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती कशी काय देण्यात आली याची सखोल चौकशी केली तर उपसंचालक कार्यालय पुणे येथील लिपिक,अधीक्षक,प्रशासकीय अधिकारी तत्कालीन डीडी यांची चौकशी झाली तर मोठे मासे हाताला लागतील.
सिव्हिल सर्जन कार्यालयातील हा दाडीवाला डॉ.ढेले,डॉ. पाटील,आणि डॉ.माने या सिव्हिल सर्जन कार्याकाळापासून कार्यरत आहे. त्याचा साथीदार धोतरवाला देखील प्रतिनयुक्ती घेऊन सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात येण्याच्या तयारीत आहे.
तात्पुरता...
