Ticker

6/recent/ticker-posts

बेकायदेशीर मुरूम उपसाला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाठिंबा आहे का?

शेतकरी नेते अतुल खूपसे यांचं प्रश्न

त्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची माफी मागा अन्यथा मोर्चा काढणार

सोलापूर : माढा तालुक्यातील कुर्डु गावात एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोनवर खडे बोल सुनावले होते. पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा असे त्या महिला आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी कारवाईसाठी आलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना कारवाई न करता,परत पाठवले होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्हारी इतनी हिम्मत...मै ऍक्शन लुंगा असे खडे बोल सुनावले होते.याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे.





शेतकरी नेत्याने महिला आयपीएस अधिकाऱ्याची बाजू घेत आंदोलनाचा दिला इशारा - माढा व करमाळा तालुक्यातील शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याची बाजू घेत,आंदोलनाचा इशारा दिला आहे. कुर्डु (ता.माढा,जि सोलापूर) येथे बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू होता,महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी बेकायदेशीर मुरूम उपसा रोखण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांना भिडले,महसूल अधिकाऱ्याना भिडले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रशासनाची बाजू घेण्याऐवजी उलट महिला आयपीएस अधिकाऱ्यास खडे बोल सुनावले आहे. शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी हकीकत सांगत खुलासा केला,हा बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू होता,अजित पवारांचा बेकायदेशीर कामांना पाठिंबा आहे का? अजित पवार यांना सोलापूरच बीड करायचे आहे का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब त्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची माफी मागावी अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोठे जनआंदोलन करणार असा इशारा दिला आहे.