Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतिकारी मुहम्मद



जगात आजपर्यंत अनेक धर्म प्रसारक,समाज सुधारक होऊन गेले. त्यांनी आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली,मानवतेची सेवा केली. अरबस्तान सारख्या उजाड, वाळवंटात मुहम्मदांचा प्रेषित म्हणून उदय होतो.आपल्या २३ वर्षांच्या प्रेषित्वताच्या अंत्यंत अल्प कालावधीत त्यांनी संपूर्ण मानवजातीवर आपल्या शिकवूणिकीची छाप पाडली,नव्हे,जीवन व्यवस्था बदलून टाकली.





महिलांना,ज्या समाजात हीन दर्जा होता,त्याला अंत्यंत उच्च स्थानावर नेऊन ठेवले म्हणजेच आईच्या पायाखाली स्वर्गाला आणून ठेवले शोषितांना,गुलामांना सरदार बनविले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात न्याय प्रस्थापित केला. युधदपिपासूंना माफ करण्याचे शिक्षण दिले. युध्दाच्या काळात लहान मुलांना,वृद्धांना मारण्यापासून रोखले समाजात खरीखुरी समता प्रस्थापित केली. भुकेलेल्यांना अन्नसुरक्षा दिली.




त्यांच्या शिकवूणीमुळे अल्पावधीतच २३3 जग व्यापले गेले म्हणूनच युरोपियन लेखक मायकल हार्ट ने अभ्यासाअंती आपल्या पुस्तकात "The Hundred "मध्ये पहिला नंबर दिला खरेच भल्यात माझा भला मोहम्मद! खर्यात माझा खरा मोहम्मद! हे अल्लाह मोहम्मद सल्लम  वर शांतीचा अखंड वर्षाव कर
आमीन