Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जैन संघटने तर्फे 'परिणय पथ' हा कार्यक्रम थाटात संपन्न

राज्य अध्यक्ष केतन शहा यांनी केले उदघाटन.
 
सोलापूर : पूर्ण दिवस भर एकत्र राहून ४४ विवाह इच्छुक युवक युवतीने निवडले आपले साथीदार,पुढील बोलणी साठी पालकांना दिली नावे,छत्रपती संभाजीनगर येथील बीजेएसचा नवा जीवन साथीदार निवड कार्यक्रम पंचताराकित हॉटेल हय्यात प्लेस येथे 'विवाह वर्स मॉडल-१ "परिणय पथ" चे भव्य उद्घाटन भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष केतनभाई शहा,सोलापूर यांच्या हस्ते दीप प्रजवलंन करून करण्यात आले. 





या कार्यक्रमात ५०० पेक्षा अधिक बायोडेटांमधून निवडलेल्या ४४ जैन तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. या अंतर्गत तरुणांना जीवनसाथी कसा निवडावा आणि नाती कशी जपावी? याचे मार्गदर्शन प्रात्यक्षिक सत्रांद्वारे करण्यात आले. हा उपक्रम समाजातील तरुणांच्या आधुनिक विचारांना समर्पित असून,त्यांना जीवनसाथी निवड प्रक्रियेत पारदर्शक,अर्थपूर्ण आणि प्रतिष्ठित मंच उपलब्ध करून देतो. देशातील ह्या प्रकारचा पहिल्या आधुनिक वधुवर परिचय मेळावा होत असून आता देशभरात ह्या प्रकारचे मेळावे संपन्न होणार आहेत.





बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्या यांच्या मार्गदर्शनाखाली बीजेएसच्या मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन,अनिल रांका (नॅशनल हेड इन्स्यूजन प्रोग्राम), केतन शहा (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष), ॲड.गौतम संचेती (माजी राज्य अध्यक्ष), डॉ.प्रविण पारख (राज्य महासचिव), पारस चोरडिया (राज्य प्रमुख -इन्सेप्शन प्रोग्राम),किशोर ललवानी (डएउ सदस्म),पारस बागरेचा (जिल्हा सल्लागार),राजेंद्र पगारिया (जिल्हा अध्यक्ष),दर्शना लुनावत (महिला विंग जिल्हा अध्यक्ष),संजय लोढा (जिल्हा सचिव), वनिता छाजेड (महिला विंग जिल्हा सचिव),रवि खिंवसरा,अनिल संचेती,फूलचंद जैन राजेंद्र सेठिया आणि ए.आर.मल्टीमीडिया यांनी विशेष सहकार्य केले.

या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना,निर्मिती आणि संचालन मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी केले आहे.