Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर येथे अशासकीय पदासाठी अर्ज करण्याचे अवाहन

सैनिकी मुलींचे वसतिगृह सोलापूर येथे अशासकीय पदांची भरती.

सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर यांचे अधिपत्ये खालील सैनिकी मुलींचे वसतिगृह  सोलापूर येथे अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षकाचे ०१ पद भरावयाचे आहे. मानधन रू. २४, ८७५ प्रतिमहा असेल. उमेदवार हा युध्द विधवा किंवा माजी सैनिकाच विधवा पत्नी असावी. उमेदवारास मराठी व इंग्रजी टंकलेखन व संगणक हाताळण्याचे  ज्ञान असणे आवश्यक आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील  युध्द  विधवा व माजी सैनिक विधवा पत्नींनी आपले अर्ज सैनिक सेवेची इतर शैक्षणिक कागदपत्रे दि. ०३ सप्टेंबर २०२५ पूर्वी या कार्यालयात जमा करावी त्यानुसार दि.०३ सप्टेंबर २०२५ राजी मुलाखती घेण्यात येतील. तसेच उमेदवारांनी मुलाखतस येताना स्वत:ची मुळ कागदपत्रे सोबत आणावीत. 

सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छूक युध्द विधवा व माजी सैनिक विधवा पत्नींनी  या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारी सोलापूर यांनी केले आहे. 

                               
                 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे  अशासकीय लिपिक पदासाठी अर्ज करण्याचे अवाहन.
 
सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे ०१ लिपिक टंकलेखक हे अशासकीय पद मेस्को मार्फत भरावयाचे असून सोलापूर जिल्ह्यातील फक्त माजी सैनिक रोजगार पटावर नोंद आहे. त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल. 

दि. ०३ सप्टेंबर २०२५ पुर्वी या कार्यालयात आपले अर्ज  सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह (मुळ कागदपत्र व त्यांची छायांकित प्रती ०२ ) सादर करावे.  प्राप्त अर्जामधील उमेदवारांची दि. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी मुलाखती घेण्यात येतील.  

सदर पदाकरीता मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिट किमान ३० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच  महाराष्ट्र शासनाचे  MS-CIT प्रमाणपत्र धारण केलेले असावे किंवा  मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहिल. तरी सदर संधीचा सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,सोलापूर यांनी केले आहे.