भारतीय जैन संघटना जैन समाजातील कोटुंबिक वाद-विवाद मिटवण्यासाठी पारिवारिक अदालत- कौटुंबिक लवादाची स्थापना करणार अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित ऑनलाईन मीटिंगमध्ये सांगितली. कार्यक्रमाची सुरूवात नवकार महामंत्राने झाली. स्वागत व प्रास्ताविक राज्य अध्यक्ष केतन शाह यांनी केले. नंदकिशोर साखला पुढे म्हणाले,समाजाच्या समस्या पोलीस स्टेशन-कोर्ट कचेरी पर्यंत न जाता समाजाच्या मध्यस्थीने सोडविल्या गेल्या पाहिजे. कुटुंबात क्लेश होतात. ते परिवार व समाजाच्या पंचा द्वारे अंतर्गत मिटविले पाहिजे. या साठी भारतीय जैन संघटनेने पूर्वी अशा प्रकारचे कौंटुबिक लवाद नेमले होते. आता त्याचे पुनर्जीवन करुन नवीन स्वरूपात स्थापन करुन,त्याची कार्यवाही राज्य भरात लवकरच सूरू होणार आहे. यावर संस्थापक श्री शांतीलालजी मुथा हे गहन अभ्यास करत आहे. याचे सूतोवाच त्यांनी ०८ ऑगस्टच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये केले होते.
पुर्वी देखील पंच व्यवस्था केली होती. पंचाच्या समोर, साधु संताच्या समोर समस्या सोडविल्या जायायच्या. संघटनेच्या कौटुबिंक-लवाद मध्ये जैन समाजातील जिल्ह्यातुन एक निवृत्त न्यायाधीश,एक ज्येष्ठ वकील,एक महिला सदस्य व दोन संघटनेतील अनुभवी व वरिष्ठ कार्यकर्ते अशा प्रकारे ५ लोकांचे पॅनल राहील. हे पॅनल समझोता करण्याचे काम करेल यांचेकडून समस्या सोडवली गेली नाही,तर ती समस्या पुणे येथील मुख्य कार्यालयात पाठविली जाईल व तेथील पंचद्वारा प्रश्न सोडवला जाईल.
वरील झूम मीटिंग मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला,राष्ट्रीय सचिव दिपकजी चोपडा,राज्य अध्यक्ष केतन शहा,राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा व विनय पारख,राज्य मुख्य सचिव प्रविण पारख,सचिव आनंद ओस्तवाल,हरकचंद बोरा,अभिनंदन खोत,झुंबरलाल मुथा,चंद्रकांत डागा,सुमित मुनोत व इतर निवडक व ज्येष्ठ कार्यकर्ते असे ३१ पदाधिकारीउपस्थित होते. महाराष्ट्रात एकूण १५ जिल्हे यासाठी तयार केल्याची माहिती राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी सांगीतले. सोलापूर,लातुर व धारशिव जिल्ह्या करिता एक लवाद पॅनल,खानदेश जळगांव व धुळे नंदुरबार एकत्रित अश्या प्रकारे वेग वेगळ्या जिल्ह्यात कौटुंबिक लवाद ची स्थापना होणार आहे.
पॅनल तयार करण्यासाठी जिल्ह्यातून नावे पदाधिकार्या कडून मागवली असुन,त्यांची अंतिम निवड संस्थापक शांतीलाल मुथा हे करतील. आभार प्रदर्शन प्रवीण पारख यांनी केले.