Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर रेल्वे स्टेशन चे नाव श्री सिद्धरामेश्वर रेल्वे स्टेशन असे नामकरण करावे - विजयकुमार हत्तुरे

               

सोलापूर : जागतिक लिंगायत महासभा,महाराष्ट्र वतीने सोलापूर रेल्वे स्टेशन विभागातील विविध प्रश्न व नवीन रेल्वे सेवाबाबत रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांना प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी सोलापूर दौरा वर आले असता मागणीचे निवेदन दिले. पुढील प्रमाणे

1) सोलापूर रेल्वे स्टेशन याचे श्री सिद्धरामेश्वर रेल्वे स्टेशन असे नामकरण करावे.

2)सोलापूर ते दिल्ली प्रवासी करिता नवीन बसव सुपर फास्ट एक्सप्रेस गाडी सुरु करावे.

3) नियोजित टिकेकरवाडी टर्मिनल ला मंजुरी द्यावे.

4)सोलापूर ते बेंगलोर नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालू करावे. प्रामुख्याने मागण्या आहेत.

या प्रदेशातील आर्थिक विकास व पर्यटनाला चालना मिळेल. या नवीन रेल्वे मुळे येथील नागरिकांना खूप फायदा होईल आणि दळणवळण वाढणार आहे.                                   
याप्रसंगी कर्नाटक राज्याचे ज्येष्ठ नेते शंकर गौडा पाटील हुबळी,कलबुर्गीचे आमदार बसवराज मत्तीमोड, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगांव,नाना गौडा बिरादार,प्रा.रवी बेल्ली,बसवराज बैचाबल,सिद्धाराम कटारे,उमेश कल्याणी,नामदेव फुलारी,रुद्रप्पा कांबळे,अमोल म्हमाणे आदी उपस्थितीत होते.