Ticker

6/recent/ticker-posts

भारत गौरव यात्रा दुरिस्ट ट्रेन या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थळ भेट मोहिम सुरू

भारत गौरव यात्रा दुरिस्ट ट्रेन या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थळ भेट मोहिम सुरू

ज्या युवक,शिवप्रेमी,इतिहास प्रेमी यांना या प्रेरणादायी यात्रेत सहभागी व्हावयाचे आहे,त्यांनी तहसिल कार्यालय, उत्तर सोलापूर येथे संपर्क साधावा

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने भारत गौरव यात्रा दुरिस्ट ट्रेन या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थळ भेट मोहिम सुरू करण्यात येत असून हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारसाला मानवंदना देणार असून नागरिकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख किल्ल्यांप्रमाणेच त्या भोवतीच्या धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास घडवून आणण्यासाठी संधी देतो.

या योजने अंतर्गत पहिली ट्रेन 9 जून 2025 रोजी (तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनी) मुंबई सीएसटी या स्थानकावरून सुटणार असून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणेबाबत सुचित केले आहे. त्याअनुषंगाने ज्या युवक,विद्यार्थी,विद्यार्थी शिवप्रेमी,इतिहास प्रेमी यांना या प्रेरणादायी यात्रेत सहभागी व्हावयाचे आहे. त्यांनी तहसिल कार्यालय,उत्तर सोलापूर येथे संपर्क साधावा.

याबाबत भारतीय रेल्वेचे प्रतिव्यक्ती टूर किंमत पुढीलप्रमाणे स्लीपर इकोनॉमी- 13 हजार 155 रुपये, 3 एसी कम्फर्ट- 19 हजार 840 रुपये, 2 एसी सुपीरियद- 27 हजार 365 रुपये तरी कृपया अधिकतम माहितीसाठी तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले आहे.