Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हयातून उत्तरेश्वर फरिद जानराव यांना पारितोषिक या पुरस्कारासाठी शासनाकडून निवड


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक व्यक्ती व एक संस्थेची निवड

सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व  उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक,व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार,पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार,संत रविदास पुरस्कार, शाहु,फुले,आंबेडकर पारितोषिक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
 
सोलापूर जिल्हयातून उत्तरेश्वर फरिद जानराव, मु.पो.जिव्हाळा,निवास संत सेना नगर,ता.माढा जि.सोलापूर यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी व भटके व विमुक्त विकास प्रतिष्ठान,७९४ दक्षिण कसबा,शिवस्मारक जवळ सोलापूर या संस्थेची शाहु,फुले,आंबेडकर पारितोषिक या पुरस्कारासाठी शासनाकडून निवड करण्यात आलेली आहे.
 
या पुरस्कारार्थी व्यक्ती यांना रक्‍कम रू.७५०००/- सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे तसेच पुरस्कारार्थी संस्थेस रक्‍कम रू. ७.५० लक्ष सन्मानपत्र,मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम दि.१० जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृह,नरिमन पॉईंट मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला असल्याचे सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.