सोलापूर : विद्युत पारेषणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून वैराग ता बार्शी येथे अत्यंत जबाबदारीने कामगिरी पार पाडणाऱ्या गणेश शिंदे यांची सांगली विद्युत पारेषण मध्ये स्कॉडमध्ये नियुक्ती झाली आहे. तर वैराग येथे अजिंक्य काकडे यांची नियुक्ती झालीं आहे .
मनमिळाऊ स्वभाव आणि कामाची जबाबदारी खांद्यावर घेणार्या एका उमद्या अधिकाऱ्याच्या बदलीमुळे कार्यालयातील कर्मचारी आणि लाईटच्या तक्रारी घेऊन त्यांची सोडवणूक होण्यासाठी साहेबांकडे येताच प्रश्न तात्काळ सुटतो अशी भावना निर्माण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये निराशेची भावना निर्माण झाली आहे.
सहकारी वृत्ती राखणारे व्यक्तिमत्व अशी ख्याती असल्याने ते जिथे जातील तिथे आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवतील अशी भावना जेष्ठ नेते आणि समाजसेवक अच्युतआप्पा शेरखाने यांनी व्यक्त केली. शिंदे यांचा निरोप समारंभ करण्यात आला.
यावेळी बार्शी परिवर्तन उपसंपादक गणेश मसाळ,बप्पा कापसे,वंचित संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र डोळसे,संजय गाडे,अरुण शेंडगे,धनाप्पा आनंद,सुशांत लोखंडे,उगले, रवी जांभळे,गणेश गवळी,शिवाजी जाधव,सद्दाम सय्यद, भंडारे,सुनील कोळी,दयानंद साळुंखे आदी उपस्थित होते.
