प्रति दिन,प्रति देशी गाय अनुदान अंमलबजावणीचा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ
सोलापूर : पशुसंवर्धन विभागाच्या दि.08 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णया मध्ये नमुद केल्याप्रमाणे गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी रु.50/- प्रति दिन,प्रति देशी गाय अनुदान योजनेकरीता महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत व सदर शासन निर्णयामधील नमुद निकषानुसार पात्र गोशाळा,गोसदन पांजरापोळ व गोरक्षण संस्थांनी ऑनलाईन अर्ज करणेची मुदत दिनांक 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश व स्वरुप,अनुदान पात्रतेच्या अटी व शर्ती, योजनेची अंमलबजावणी,तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https//schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
सदर शासन निर्णयातील नमूद पात्रतेच्या अटीनुसार इच्छुक पात्र संस्थांनी ऑनलाइन पध्दतीने विहित नमुन्यातील अर्ज उपरोक्त संकेतस्थळावर दिनांक 30 जून 2025 पर्यंत सादर करावेत. महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यालयाकडे थेट प्रस्ताव सादर केलेला तसेच ई-मेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,डॉ.विशाल येवले यांनी केले आहे.