सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर व के.पी.मंगळवेढेकर इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवार दिनांक 6 जून 2025 रोजी "एस.पी.एम. इंग्लिश मिडियम स्कुल,डफरिन चौक,होम मैदान समोर,सोलापूर" येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.
पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते होणार आहे. या रोजगार मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सदर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय.टी.आय, वेल्डर,फिटर,डिप्लोमा,ग्रॅज्युएट,ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी,इलेक्ट्रीशीयन,मशिन ऑपरेटर, बी.कॉम,एम.कॉम अशा प्रकारची एकुण 2 हजार 100 पेक्षा जास्त रिक्तपदे 18 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवरांनी रिज्युमच्या तीन प्रती आणि कागदपत्रासह शुक्रवारी दिनांक 6 जून 2025 ठीक सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत "एस.पी.एम.इंग्लिश मिडियम स्कुल,डफरिन चौक,होम मैदान समोर, सोलापूर" येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
याबाबत अधिक माहितीसाठी कार्याल्यानी वेळेत 0217-2992956 या दुरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट,पार्क चौक,सोलापूर येथे संपर्क साधावा तसेच https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावी,असे आवाहनही कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.