सेालापूर : दि.१६ (एमडी२४न्यूज) शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु असून,सोलापूर जिल्ह्यातील शासकीय वस्तीगृहांमध्ये निशुल्क प्रवेशाची अंतिम तारीख - अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा निकाल लागल्यापासुन पुढील 15 दिवस,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहे ही योजना राबविली जाते. सदर योजनेंतर्गत जिल्ह्यात एकुण 16 शासकीय वसतिगृहे असून त्यामध्ये मुलांसाठी 9 व मुलीसाठी 7 शासकीय वसतिगृहांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती,जमाती,इतर मागासवर्ग,विमुक्त व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या तसेच दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना सुरक्षित,सुसज्ज वातावरणात उत्तम शिक्षण देऊन त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील करणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. प्रवेश कोणासाठी आहे- इयत्ता 8 वी पासून ते उच्च/व्यावसायिक शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छणारे विद्यार्थी.
प्रवेशित विद्यार्थ्यांना निशुल्क पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा - शैक्षणिक इयत्तेनुसार क्रमिक पाठ्यपुस्तके व आवश्यक स्टेशनरी, स्पर्धा परीक्षा (CET, NEET, MPSC, UPSC, इत्यादी) तयारीसाठी संदर्भ पुस्तके,वातानुकूलित संगणक कक्ष, ई-लायब्ररी, अभ्यासिका, व अंतर्गत जिम, भोजन व शुद्ध पिण्याचे पाणी, CCTV कॅमे-यांसह 24 तास सुरक्षा तसेच 24 तास सुरक्षारक्षकांची उपस्थिती,प्रशस्त स्वच्छ निवासगृहे,क्रीडा साहित्य,व मैत्रीपूर्ण अल्हाददायक शैक्षणिक वातावरण.
निर्वाहभत्ता : तालुका स्तरावर 500 रुपये/महिना आणि जिल्हा स्तरावर 600 रुपये (मुलींसाठी रु. 100/-ज्यादा)
जिल्ह्यातील वसतिगृहाचे ठिकाणे- मुलांसाठी (9 वसतिगृह): सोलापूर व बार्शी प्रत्येकी 2 वसतिगृह, अक्कलकोट,पंढरपूर,माढा,अकलूज,करमाळा प्रत्येकी 1 वसतिगृह. मुलींसाठी (7 वसतिगृह) : सोलापूर,अक्कलकोट,मोहोळ,पंढरपूर,बार्शी,कुडूवाडी,माळशिरस.
अर्ज करण्याची प्रक्रिया : अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा निकाल लागल्यापासून पुढील 15 दिवस
संपर्क: http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सात रस्ता,सोलापूर (दुरध्वनी क्र. 0217-2734950) या क्रमांकावर संपर्क साधावा.
एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य : "एखाद्या विद्यार्थ्यांचे जीवन बदलण्यासाठी फक्त एक संदेश पुरेसा आहे! ही माहिती आपल्या परिसरातील गरजवंत विद्यार्थी,पालक, शिक्षक,व सामाजिक कार्यकत्यांपर्यंत पोहोचवा. विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा लाभ मिळवून देण्यात आपणही सहभागी व्हा!" असे सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी कळविले आहे.