WOW तर्फे नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आणखी एक पाणपोई,निवाऱ्याची सोय
सोलापूर : Wow अर्थात वर्ल्ड ऑफ वूमन या विधवा, घटस्फोटीत,दिव्यांग,पिडीत,शोषित,ज्येष्ठ महिलांना "स्वयंसिद्धा" बनविणारी एकमेव शासन मान्यता प्राप्त संस्थेने सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी उत्तर तहसील कार्यालय येथे देखील शहर व ग्रामीण भागातून शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या महिला व जेष्ठ नागरिकांसाठी थंड पाण्याची सोय तसेच सध्याच्या कडक उन्हाळ्यात निवारा,सावली मिळावी म्हणून हिरवी जाळी लावून दिली असून पानपोईचा शुभारंभ संस्थापिका विद्या लोलगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या सहसचिव गीता मुळे,कोषागार सरोजिनी जाधव व प्रमुख मार्गदर्शक वसंत जाधव यांचे सह शोभा गायकवाड,मार्था आसादे,शारदा मसूती,तेजश्विनी मनगोळी, निलाक्षी जाधव,मंगल गायकवाड,प्रमिला,सुनीता बिराजदार यांची देखील उपस्थिती होती.
सोलापूरच्या विविध शासकीय कार्यालयात आलेले असंख्य महिला जेष्ठ लोक यांना सध्याच्या कडक उन्हाळ्यात उष्णतेचा तीव्र त्रास होत असून तसेच सारखी तहान लागत असून त्याचे अभावी चक्कर येणे,आजारी पडणे अश्या घटना घडत असल्याने महिलांच्या सेवेच्या बाबतीत कायम अग्रेसर असलेले WOW यासंस्थेने मागील महिन्यात जुने कंकुबाई नेत्र रुग्णालय येथे सुरू झालेल्या उत्तर तहसील कार्यालय येथे देखील थंड पाणी आणि सावली साठी नागरिकांना,तेथे येणाऱ्या महिलांना निवारा मिळावा म्हणून अशीच सुविधा उपलब्ध करून दिली होती व त्याचे समाजातील,ग्रामीण भागातील महिलांना विशेष कौतुक केले होते.
आज देखील शासकीय कार्यालयात कामासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक महिला यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत संस्थेचे मनापासून आभार मानले. अनेक महिलांनी आपले मनोगतात संस्थेच्या महिलांचे कार्याचे व त्यामुळे महिलांना मिळणारी मदत किती महत्वाची असल्याचे सांगत अश्या प्रकारची मदत समाजात महिलांच्या शासन मान्य संस्थेमार्फत होते ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याचे संस्थापिका विद्या लोलगे यांनी सांगितले.