सोलापूर : दि.१६ (एमडी२४न्यूज) सोलापूर जिल्हा प्रशासन प्रकल्प संचालक (आत्मा), सोलापूर कार्यालयाच्या माध्यमातून एकात्मिक पर्यटन विकास आराखड्या अंतर्गत, जिल्ह्यातील स्थानिक संस्थांच्या (विशेषत: शेतकरी उत्पादक कंपन्या, बचतगट,उत्पादक गट इत्यादी) माध्यमातून एकूण 5 पथदर्शी कृषी पर्यटन केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित आहे.
सदर उभारणी पंढरपूर,अक्कलकोट, बार्शी आणि करमाळा या 4 प्रमुख मंदिरांच्या परिसरात प्रत्येकी एककेंद्र, तसेच उजनी धरणाच्या जलाशया लगतच्या गावात एक केंद्र उभारणे अभिप्रेत आहे. सदर केंद्रे संबंधित मंदिराच्यासुमारे 10 कि.मी.त्रिज्येतील मुख्य रस्त्यालगत किंवा जवळच्या ठिकाणी असावीत. उजनीच्या बाबतीत जलाशया लगतच्या गावांमध्ये स्थळ असावे.
अर्ज सादर करण्यास पात्र संस्थांमध्ये स्थानिक शेतकरी उत्पादक कंपन्या,बचतगट,उत्पादकगट,सी.एफ.एल., सी.उम.आर.सी.यांचा समावेश आहे. प्राप्त अर्जांवर जिल्हास्तरीय तांत्रिक समितीमार्फत ठरवलेल्या निकषानुसार निवड केली जाईल.
अर्ज व इतर अनुषांगिक माहिती प्रकल्प संचालक (आत्मा), कार्यालय नवीन आर.टी.ओ.ऑफिसच्या मागे,विजापूर रोड, सोलापूर येथे उपलब्ध असणार आहे. अर्जाचे शुल्क 100 रुपये असून फुटाणे विक्रम (एटिएम) मो.नं. 9423232569 यांच्याकडून प्राप्त करून घ्यावा. अर्ज वाटपाचा कालावधी दि. 5 मे 2025 ते 15 मे 2025 ऐवजी मुदतवाढ दि. 20 मे 2025. विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज प्रकल्प संचालक (आत्मा), कार्यालयात सादर करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 ऐवजी मुदतवाढ 26 मे 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल,विहित मुदती नंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अशी माहिती प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर यांनी दिली आहे.