Ticker

6/recent/ticker-posts

सर्व आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ३१ जानेवारी पर्यत सादर करा

शासकीय व खाजगी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ३१ जानेवारी पर्यत  सादर करा
          
सोलापूर : दि.१३ (एमडी२४न्यूज) जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्‍थापनांनी त्‍याच्‍या आस्‍थापनेवर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची त्रैमासिक विवरण नमुना ईआर-१ ची सांख्यिकी माहिती ३१ जानेवारीपर्यत ऑनलाईन पद्धतीने सादर करा, असे आवाहन जिल्‍हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले.
                
सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्‍थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्‍तीने अधिसुचित करणे) कायदा १९५९ व नियम १९६० च्‍या कलम ५ (१) नुसार प्रत्‍येक तिमाहीस विहीत नमुना ईआर-1 मध्‍ये नियमीतपणे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन पध्‍दतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्‍या अनुषंगाने तिमाही नमुना ईआर-१ (ER-१) मधील त्रैमासिक सांख्यिकिय माहिती नोदणीकृत सर्व आस्‍थापनांनी  यापुर्वी दिलेल्या युझर नेम व पासवर्डचा वापर करुन  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर त्रैमासिक विवरण पत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्‍दतीने सादर करावे.
        
तसेच प्रत्‍येक आस्‍थापनेने आपला नोंदणी तपशील, आवश्यक  सर्व माहीती नोंदवून अद्यावत करावा. त्रैमासिक ईआर-१ किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत करतांना कोणत्‍याही प्रकारची अडचण आल्‍यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नॉर्थ कोट,पार्क चौक सोलापूर (0217-2992956)  या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले केले आहे.