Ticker

6/recent/ticker-posts

क्षयरोग जनजागृतीपर कार्यक्रमाचे उदघाटन


सोलापूर : पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार संपूर्ण भारत देशातून सन 2025 अखेर पर्यंत क्षयरोगाला हददपार करण्याचे उददीष्ट आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत 100 दिवसीय क्षयरोग मुक्त मोहिम,निक्षय शिबीरे आयोजीत करण्याची योजना केंद्रीय आरोग्य व कु.क.मंत्रालय यांनी तयार केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 30 जिल्हयांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राची निवड करणेत आलेली आहे. केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, नवी दिल्ली यांचे हस्ते दि. 07/12/2024 रोजी सदर मोहिमेचा संपूर्ण देशामध्ये शुभारंभ करणेत आला. त्यानुसार सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातही सदर मोहिमेचा शुभारंभ दि.07/12/2024 रोजी करणेत आलेला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर अभियानामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या गटामधील झोपडपटटीतील रहिवासी,60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक,मधुमेह बाधीत व्यक्ती, धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती, बी.एम.आय.(Body Mass Index) 18 पेक्षा कमी असलेल्या व्यक्ती, मागील 5 वर्षाचे क्षयरुग्ण व मागील 2 वर्षाच्या क्षयरुग्णांच्या सान्निध्यातील व्यक्ती, विडी कामगार,टॉवेल कामगार,उसतोड कामगार व साखर कारखात्यातील कामगार,इतर औद्योगीक कारखान्यामध्ये काम करणारे कामगार तसेच विविध प्रकारच्या शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी इ.ची.क्षयरोग विषयक थुंकी तपासणी व क्ष-किरण तपासणी या 100 दिवसाच्या अभियानामध्ये करणेचे आहे. जेणे करुन क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करुन सोलापूर शहरातील क्षयरोगाचा प्रसार कमी होउन, सोलापूर शहर क्षयमुक्त करणेस मदत होईल.

त्याअनुषंगाने रविवार दि.12/01/2024 रोजी पासून सोलापूरचे ग्रामदैवत श्री.सिध्देश्वर महाराज यांची यात्रा चालू होत असून, यात्रेमध्ये एक ते दिड लाख भक्तगण सहभागी होतात. दि.13 ते 15 जानेवारी दरम्यान जनभागीदारीतील मकर संक्रांत व पोंगल सण याचे औचित्य साधून, सोलापूर शहरातील नागरिकांना क्षयरोग विषयक माहिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहर क्षयरोग केंद्र,सोलापूर महानगरपालिका व रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ यांचे संयुक्त विद्यमाने होम मैदान समोर मदर तेरेसा पॉलिक्लिनीक या ठिकाणी 100 दिवसीय क्षयरोग मुक्त अभियानाचा आयईसी स्टॉल उभारून क्षयरोग विषयक जनजागृतीपर कार्यक्रम घेणेत आला. सदर कार्यक्रमाचे उदघाटन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. 

सदर कार्यक्रमास महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, रोटरी क्लब सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉ.जान्हवी माखीजा तसेच सुनिल दावडा,सचिव ॲड.स्वप्नील कोंडगुळे,मनपा प्रतिनियुक्ती आरोग्याधिकारी डॉ.राखी माने,शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अरुंधती हराळकर,शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.आतिश बोराडे व शहर क्षयरोग केंद्राकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते.  यामध्ये सर्व मान्यवर,अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी क्षयरोग जनजागृतीची लोगो छापलेले असलेले एक नाविण्यपूर्ण जॅकेट बनविण्यात आले होते व ते सर्वांनी परिधान केले होते. आजचा दिवस 68 लिगांना नंदिध्वज मिरवणूकीने तैलाभिषक करणेत येतो. याचे औचित्य साधून मानाच्या काठयांसोबत चालणाऱ्या मानकऱ्यांना व भाविकांना श्री.सिध्दरामेश्वरांचे चित्र व क्षयरोग विषयक जनजागृतीचे स्टीकर्स असलेली प्रतिकात्मक लहान नंदिध्वज तयार करुन ती जनजागृतीसाठी वाटप करणेत आली. सदर कार्यक्रमात श्री.सिध्देश्वर महाराजांच्या जयघोषासोबत टीबी हारेल देश जिंकेंल चा नारा सदर स्टॉलवर दिवसभर देणेत आला. कार्यक्रम स्थळी 68 लिंगांना परिक्रमा घालणाऱ्या सोलापूर शहरातील डॉ.राजेंद्र घुली,ॲड.मिलींद थोबडे,वाले इ.अनेक मान्यवर व प्रतिष्ठीत नागरिकांनी 100 दिवसीय क्षयरोग मुक्त अभियानाच्या आयईसी स्टॉलला भेट दिली व सदर उपक्रमाचे कौतूक केले.