जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन २०२४ अंतर्गत सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज केगांव,सोलापूर येथे विज्ञान प्रदर्शन व सायन्स मेळाव्याचे आयोजन
सोलापूर : दि.०३ (एमडी२४न्यूज) क्रीडा व युवक सेवा, संचालनालय पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन अंतर्गत सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज केगांव,सोलापूर येथे विज्ञान प्रदर्शन व सायन्स मेळाव्याचे आयोजन सकाळी ०९ वा. दिनांक ०५ ते ०६ डिसेंबर २०२४ या कालावधीत सांयन्स हॉल येथे करण्यात आले आहे. संकल्पना आधारित बाबीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसेकल्पना "Innovation in Science and Technology सन २०२४-२५ या वर्षासाठी निश्चित केलेली असून सोलापूर शहर व जिल्हयातील इंजिनिअरीग कॉलेज,वैदयकीय महाविदयालय,कृषी महाविदयालये,औद्योगिक प्रशिक्षक्षण संस्था,शाळा,महाविदयालये शैक्षणिक संस्था इत्यादी युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवक व युवती यांनी सहभाग नोंदवावा तसेच 9970095315 या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सव बाबी,सहभाग संख्या व बक्षिस रक्कम पुढील प्रमाणे - संकल्पना आधारित स्पर्धा –विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना सहभाग-5 बक्षिस रक्कम प्रथम-5000/- व्दितीय–3000/- तृतीय-2000.
