Ticker

6/recent/ticker-posts

अशासकीय वाहन चालकपदासाठी भरती...

अशासकीय वाहन चालकपदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती
              
सोलापूर : दि.१४ (एमडी२४न्यूज) सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात  अशासकीय वाहन चालक एक  पद भरावयाचे आहे. जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष जिल्हा सैनिक कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,यांनी केले आहे.
                 

सदर पदाकरिता त्याच दिवशी मुलाखती घेण्यात येणार असल्याने उमेदवारांनी स्वतःची मुळ कागदपत्रे सोबत आणावीत. या पदाकरीता उमेदवारास चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना व अनुभव असणे आवश्यक आहे.  हे पद  फक्त माजी सैनिक संवर्गातून भरण्यात येणार आहे. तसेच सदर पदाकरीता सैन्यातील वाहन चालक संवर्गातील माजी सैनिकास प्राधान्य देण्यात येईल. तरी जिल्यातील माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.