Ticker

6/recent/ticker-posts

बोट दुर्घटनेतील ३५ प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे शौर्य दाखवणाऱ्या आरिफ...


मुंबई : महाराष्ट्रातील माझ्यासारख्या असंख्य सर्वसामान्य नागरिकांना हा अशा प्रकारचा धार्मिक समतोल राखणारं हिंदुत्व अपेक्षित आहे. 

नीलकमल बोट दुर्घटनेतील ३५ प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे शौर्य दाखवणाऱ्या आरिफ बामणे ह्यांचा शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांनी सन्मान केला.





ह्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत,सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि उपनेते आमदार मनोज जामसुतकर इतर शिवसैनिकउपस्थित होते. वेगवेगळ्या माध्यमातून मुस्लिम द्वेष पेरून पुरोगामी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हीं ही कृती करून योग्य ती समय सूचकता दाखवला त्याबद्दल तुमचे खूप-खूप धन्यवाद व मनःपूर्वक आभार मानण्यात आले.