Ticker

6/recent/ticker-posts

माझ्यावरील दाखल असलेले गुन्ह्याची जाहीर प्रसिद्धीकरण मी अपक्ष उमेदवार सैफन शेख,सोलापूर शहर मध्य २४९ विधानसभा


सोलापूर जाहीर प्रसिद्धीकरण - मी सैफन अमिनसाहेब शेख (रा.१२८ नानी मंजिल, कुर्बान हुसैन नगर,सोलापूर) २४९, सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. सामान्यातल्या सामान्य माणसाला भारतीय संविधानाने प्रत्येक मतदाराला प्रदान केलेल्या अधिकाराची जाणिव व्हावी, त्याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला मतप्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करता यावं,या प्रामाणिक भावनेतून मी निवडणूक लढवित आहे. 


मी गेल्या ०२ दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात अभिप्रेत असलेली पत्रकारिता व्यवसाय नाही तर वसा म्हणून करीत आलो आहे. मी हल्ली महाराष्ट्र दर्पण अर्थात एमडी२४न्यूज चा संपादक आणि सुर्योदय दैनिकात जिल्हा प्रतिनिधी म्हणून कर्तव्य बजावत आहे.


भारतीय लोकशाहीला अभिप्रेत असलेला चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता करीत असताना,दाम,दंड बळाला न जुमानता प्रामाणिकपणे काम केले. या काळात माझ्या दबाव-दडपणाला बळी न पडता,काम करीत असताना दुखावलेल्या राजकीय पटलावरील गल्ली छाप पुढाऱ्यांनी,मला केवळ अडचणीत आणण्यासाठी हस्ते-परहस्ते गुन्हे दाखल केले. 




उमेदवाराचं चरित्र आणि चारित्र्य मतदारांना ज्ञात असावं, असं निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता निर्देशित करते. त्या अनुषंगाने ह्या विरोधात सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडे दाखल असलेल्या गुन्ह्यांची संपूर्ण माहिती पोलीस आयुक्तालयाकडे मागितली, ती माहिती मी या प्रसिद्धीकरणाद्वारे मी निवडणुकीत उभारलेल्या मतदार संघातील मतदारांना ज्ञात असावी,याकरिता जाहीर करीत आहे.

दाखल गुन्ह्यांच्या तपशीलबाबत...

१)  सदर बझार : ०६/२०२३ भादंविक ३८५,३४

२)  सदर बझार : ५४६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३५६, ३५१(२), ३(५)

३)  सदर बझार : १३५/२०२४ भादंविक ३५४, ३५४(ड)

                         
सैफन अमिनसाहेब शेख, अपक्ष उमेदवार,२४९, सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघ. (रा.१२८ नानी मंजिल, कुर्बान हुसैन नगर, सोलापूर)