सोलापूर: दि.०४ (एमडी२४न्यूज) सोलापूर जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शहर आरोग्य अधिकाऱ्यांना मानाचा मुजरा घालतात. पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे नियुक्ती करून घेतली ती फक्त मुजरा करून घेण्यासाठी नव्हे तर,त्यामागे भ्रष्टाचाराचे मोठे रहस्य लपले आहे. पती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील धुमाकूळ घालत आहेत तर पत्नी शहरात धुमाकूळ घालत आहेत. ग्रामीण भागातील ज्या ज्या सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जाते,त्या सर्व वसुलीचा हिशोब सकाळी किंवा संध्याकाळी मुजरा करून दिला जातो. सोलापूर जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे आणि कर्मचाऱ्यांकडे मुजरा घालण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.
एक दाडीवाला माणूस दररोज महानगरपालिकेत जाऊन भेट घेऊन मुजरा करून येतो. डोम कावळा बारीक नजर ठेवून बाहेरच्या बाहेर हळुच गट्ट गिळून येतो. डोम कावळा बीडच्या भूमीपुत्राकडे साकडे घालण्याच्या तयारीत आहे. कधी कधी हा डोम कावळा मुजरा करून करून थकतो,आणि बस्स झाले,असला अब्रू गेलेला अधिकारी आजतागायत पाहिला नाही अशी चर्चा करतो. डोम कावळा वाहन चालवत चालवत दोघा पतीपत्नीच्या हालचालीवर,कामकाजावर नजर ठेवत आहे. अधिकाऱ्यांची चड्डी बनियन धुणारा डोम कावळा श्रीमंत झाला आहे,गावाकडे शेत जमीन घेतली आहे. कमाई करून देणाऱ्या खात्याला सोडता पण येत नाही म्हणून डोम कावळा नाईलाजाने मुजरा करतो. परंतु डोम कावळ्याच्या मनात खदखद आहे,आज नाही तर उद्या ही खदखद बाहेर येणार आहे.
बीडच्या भूमीपुत्राचे यांच्या सोबत जुने संबंध आहेत. हे संबध अबाधित ठेवण्यासाठी बीडच्या भूमीपुत्राने थेट मंडळ चेंज करत,सोलापूर शहरात आणले. बीडचे भूमीपुत्राकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात. माझं काहीही संबंध नाही,नगरविकास खात्याचा निर्णय आहे,बोट थेट आरोग्य मंत्र्याकडे किंवा नगरविकास खात्याकडे दाखवितात. परंतु पालघर ते सोलापूरला आणताना याच बीडच्या भूमीपुत्राने एनओसी दिली आहे. हे विसरतात की काय असा प्रश्न पडला आहे.भविष्यात बीडच्या भूमीपुत्राला हे पतीपत्नी घेऊन बुडणार आहेत.