Ticker

6/recent/ticker-posts

बेकायदेशीर प्रतिनियुक्ती आरोग्य मंत्र्यांना ऐन निवडणुकीत जड जाणार. पंचनामा भाग-०२.क्र-०४.

             मला नाही अब्रू मी कशाला घाबरू

सोलापूर : दि.०५ (एमडी२४न्यूज) सोलापूर शहर आरोग्य अधिकारी पदी अर्हता नसणाऱ्या डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करत आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी स्वतःच स्वतःला अडचण करून घेतली आहे. आरोग्य मंत्र्यानी महाराष्ट्र राज्यात अशा बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या किती प्रमाणात केल्या आहेत,राज्याच्या आरोग्य खात्यात किती भोंगळ कारभार सुरू आहे,हे यावरून दिसून येत आहे .पन्नास खोके असा आरोप करणाऱ्या विरोधकांना पुन्हा एकदा नवीन संधी मिळाली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट आरोग्य मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सोलापुरातील आरोग्य खात्यात धुमाकूळ घालणारे बीडचे भूमीपुत्र पुण्यात बसून बघत बसले आहेत. बीडच्या भूमीपुत्राने महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्र्याच्या हाताला धरून हा गोंधळ सुरू केलाय म्हणे. बीडच्या भूमीपुत्रा विरोधात,अनेक बातम्या प्रसारित करून हा विषय समस्त सोलापूरकरांच्या नजरेस आणून दिला,राज्याच्या आरोग्य खात्यात सुद्धा या विषयाची चर्चा झाली,पण मला नाही अब्रू मी कशाला घाबरू अशी विदारक परिस्थिती झाली आहे. सोलापूर शहर आरोग्य अधिकारी पदी बेकायदेशीर प्रतिनियुक्ती आरोग्य मंत्र्याना निवडणुकीत जड जाणार आहे,हे कळून चुकले आहे.

सोलापूर शहर आरोग्य अधिकारी पदी एमबीबीएस डीपीएच किंवा एमडी पीएसएम डॉक्टराची नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती करण्याऐवजी आरोग्य मंत्री,आणि बीडच्या भूमीपुत्राने संगनमत करत एका ईएनटी डॉक्टराची प्रतिनियुक्ती  केली आहे. अशा बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या करण्यामागे काय  गौडबंगाल लपले आहे. किंवा  बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या मागे आर्थिक व्यवहार झाला आहे का,हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करणे गरजेचे झाले आहे. आरोग्य खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सोलापूरकर करत आहेत.

फक्त पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नावाखाली भ्रष्ट कारभार आणि बेकायदेशीर कारभार आरोग्य खात्यात सुरू आहे. नोव्हेंबर २०२३ ला पती सोलापुरात आले,सोलापुरात भ्रष्टाचार कसा करायचा याचा संपूर्ण अभ्यास केला,आणि नंतर हळूच पत्नीला सोलापुरात आणले. शासन निर्णयानुसार पतीपत्नी एकत्रिकरणाचा कायदा आहे,पण नियमात राहून कायदा अंमलात आणला जातो. सोलापुरातील आरोग्य खात्यात शासनाच्या या नियमाचे तीन तेरा करत गोरखधंदा सुरू केला आहे.