सातारा : महालक्ष्मी आधार फाउंडेशन साताराच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुकास्पद कार्य करणाऱ्या कार्यवीरांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
या कार्यक्रमात सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी झटणारे पत्रकार अल्ताफ एम. शेख यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी केलेल्या सामाजिक,शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार,सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस अधिक्षक शमाकांत शेडगे,सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सयाजीराव घाडगे,संयुक्त सचिव वंदना संकपाळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. त्यांचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याने त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हा पुरस्कार वितरण सोहळा सातारामधील राजवाडा येथील नगरवाचनालय पाठक हॉल याठिकाणी पार पाडला. या कार्यक्रमासाठी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभाताई शेलार,सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस अधिक्षक शमाकांत शेडगे,सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सयाजीराव घाडगे,संयुक्त सचिव वंदना संकपाळ मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.