Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार कधी थांबणार:एमएसडब्ल्यू आणि डोम कावळ्याचा काळा बाजार सुरूच. पंचनामा भाग-०२.क्र-०५.


सोलापूर : दि.०६ (एमडी२४न्यूज) जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या करत भ्रष्टाचार सुरू होता. वेगवेगळ्या ग्रामीण रुग्णालयातून लिपिकांच्या प्रतिनियुक्त्या करून,मेडिकल बिलांचा काळाबाजार,फिटनेस सर्टिफिकेटचा काळाबाजार सुरू होता. बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या बाबत सततचा पाठपुरावा करून बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द करण्यास भाग पाडले. परंतु भ्रष्टाचाराचा चष्मा परिधान केलेले भ्रष्ट अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्त्या तर रद्द केल्या,मात्र एमएसडब्ल्यू शिक्षण झालेल्या आणि रुग्णांच्या सेवेसाठी नियुक्त केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यास सोलापूर जिल्हा रुग्णालयातील भ्रष्ट अधिकाऱ्याने फिटनेस सर्टिफिकेट,काउंटर सिग्नेचरचे प्रशासकीय कामकाज एमएसडब्ल्यू वाल्याला लावत भ्रष्टाचाराचा गोरखधंदा पुन्हा एकदा सुरू केला आहे.





बीडच्या भूमीपुत्राला मंथली देत हा गोरखधंदा सोलापूर जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा सुरू झाला आहे. डोम कावळ्याला देखील वसुलीची जबाबदारी दिली आहे. हा डोम कावळा वाहन चालवण्याऐवजी भलतेच कुटाणे करत आहे. मेडिकल बिलांचा काळाबाजार डोम कावळ्यामार्फत सुरू आहे. वीस टक्के,दहा टक्के घेत डोम कावळा फडफड करू लागला आहे. डोम कावळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य खात्यातील एक यंत्रणा कामाला लागली आहे. डोम कावळ्याला रंगेहाथ पकडून सर्वांचा पितळ उघडे पाडण्याची तयारी केली आहे. वाहन चालवणारा डोम कावळा पतीपत्नीला अडचणीत आणणार आहे हे मात्र नक्की आहे.

ठाणे सर्कल मधून आलेले एमएसडब्ल्यू महाशय समाजकार्य सोडून लोणी गोळा करत आहेत. डोम कावळा मेडिकल बिलांचे ग्राहक पकडून संपत्ती गोळा करण्यात मग्न आहे. डोम कावळ्याच्या कीडमुळे सोलापूर जिल्हा रुग्णालयाचा नाव राज्यात बदनाम होत चालला आहे. जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे वाहन चालवणारा डोम कावळा अनेक वर्षांपासून एका शिक्षक एजंट मार्फत योग्य ती वसुली करत आहे.