विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातून आंदोलनकर्त्याचं बॅनर चोरीस; तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांची नकार ' घंटा '
पुणे : दि.१३ (एमडी२४न्यूज) येथील विभागीय कार्यालयासमोर सैफन शेख पत्रकार तथा व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते गेल्या १८ दिवसांपासून आपल्या न्याय हक्कासंदर्भात लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत आहेत. या आंदोलनकर्त्याचं बॅनर अज्ञातानं चोरून नेल्याचा आश्चर्यजनक प्रकार गेल्या २ दिवसांपूर्वी घडला. या बॅनर चोरीसंदर्भात बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या अंमलदारांनी नकार दिला असल्याची माहिती पुढं आलीय.
सोलापूर येथील पत्रकार सैफन शेख यांना एका न्यायप्रविष्ठ व एका तपासाधिन गुन्ह्याचा निकष लाऊन सोलापूर पोलीस आयुक्तालयानं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलं आहे. जिल्हा प्रवेश बंदी आदेशानंतर पत्रकार सैफन शेख याला पुणे येथे सोडण्यात आलंय.
भारतीय स्वातंत्र्य दिनी,१५ ऑगस्ट २०२४ पासून पत्रकार सैफन शेख,यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्या मागण्यांसाठी एकल आंदोलन सुरू केले होते, तडीपारनंतर त्या मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान बंडगार्डन पोलीस ठाणे,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांनी, दिनांक ०८ ऑक्टोबर सायंकाळी येऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता,परंतु कुठल्याही त्यांच्या दबावाला बळी न पडता आंदोलन करताना सतत आंदोलन सुरू ठेवल्याने ११ ऑक्टोबर रोजी अचानकपणे दोन दिवसाने बॅनर चोरी गेले.
हा बॅनर चोरीचा प्रकार घडल्यानंतर सैफन शेख यांनी यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत व संबंधित पोलीस ठाण्याचे अंमलदार यांच्या तक्रार देण्यास संदर्भात गेले असता, नकार ' घंटा ' वाजवत पोलिसांनी त्यांचा तक्रारी अर्ज स्वीकारला नसल्याचं आंदोलनकर्ते सैफन शेख यांनी म्हटलंय.
त्याउपर आंदोलनकर्ते सैफन शेख यांनी ई-मेल द्वारे ही तक्रार शासनाकडे केली असल्याचं सांगितलं आहे. पुणे शहराकडे संस्कृतीचं माहेरघर म्हणून पाहिलं जातं,या माहेरघरातच बॅनर चोरी झाल्याने या घटनेला अधिक महत्त्व आलं आहे.
#Saifan_Shaikh #md24news #solapursaweranewsnetwork #solapurnews #solapur
खरी बातमी पाहण्यासाठी
एमडी२४न्यूज चॅनलला लाईक , शेअर, सबस्क्राईब करा...
#maharashtranews #solapurnews #breakingnews #news #excusivenews #youtubechannel #youtube #youtuber #youtubers #subscribe #youtubevideos #sub #youtubevideo #like #instagram #follow #video #vlog #subscribetomychannel #gaming #music ##solapursaweranewsnetwork #solapurnews #solapur
खरी बातमी पाहण्यासाठी
एमडी२४न्यूज चॅनलला लाईक , शेअर, सबस्क्राईब करा...
#maharashtranews #solapurnews #breakingnews #news #excusivenews #youtubechannel #youtube #youtuber #youtubers #subscribe #youtubevideos #sub #youtubevideo #like #instagram #follow #video #vlog #subscribetomychannel #gaming #music #explorepage #vlogger #youtubegaming #instagood #gamer #youtubecommunity #likes #explore #youtubelife #youtubecreator #everyone #followers