Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर महापालिकेत व मनपा शिक्षण विभागाच्या वतीने माहिती अधिकार दिवस साजरा...

सोलापूर : दि.२९ (प्रतिनिधी) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीकरिता व प्रभावी अंमलबजावणीकरिता शासन स्तरावरुन सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेत व मनपा  शिक्षण मंडळ वतीने  माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कौन्सिल हॉल येथे आज माहिती अधिकार दिवसाच्या आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी उपस्थित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेतील माहिती अधिकारी व जन माहिती अधिकारी तसेच कर्मचारी यांना माहितीचा अधिकार अधिनियम या कायदयातील तरतूदी आणि कार्यपध्दती माहिती अधिकाराचे महत्व तसेच माहिती अधिकारात येणाऱ्या विषयासंदर्भात माहिती दिली. 




यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,उपाभियंता तपण डंके,पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे,उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश चौगुले तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते. 


सोलापूर मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने आज सकाळी कॅम्प प्रशाल येथे सर्व मुख्याध्यापक,प्राथमिक शिक्षक तसेच माध्यमिक शिक्षक यांना उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी माहिती अधिकार दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली. तसेच माहिती अधिकारामध्ये आलेले अर्ज कसे प्राप्त करून घ्यावे त्याचे उत्तर कशा पद्धतीने देण्यात यावे व किती वेळात देण्यात यावे याची सविस्तर माहिती यावेळी उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी दिली. तसेच माहिती अधिकाराचे जनजागृती सर्वसामान्य  लोकांपर्यंत व्हावे यासाठी कॅम्प प्रशाला येथे कॅम्प प्रशाला, उर्दू माध्यमिक विद्यालय,इंग्लिश मीडियमचे असंख्य विद्यार्थ्यांचा माहिती अधिकार दीना निमित्त जनजागृती पर रॅली काढण्यात आली. यावेळी मनपाच्या  विविध शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,रॅली माध्यमातून माहिती अधिकार दिनाचा जनजागृती करण्यात आली. यावेळी भगवान मुंडे, अल्लाबक्ष शेख,सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.