Ticker

6/recent/ticker-posts

बहुप्रतिक्षित सोलापूर विमानतळाचे उद्घाटन संपन्न

अखेर बहुप्रतिक्षित सोलापूर विमानतळाचे उद्घाटन संपन्न सोलापूर विचार मंचच्या साडेचार वर्षाच्या लढ्याला यश.


सोलापूर : दि.२९ (प्रतिनिधी) बहुचर्चित व बहुप्रतिक्षित सोलापूर होटगी रोड विमानतळाच्या नूतनीकरणानंतर लोकार्पणाचा कार्यक्रम २९ सेसप्टेंब रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. येत्या दोन ते तीन आठवड्यामध्ये सोलापूर-पुणे-मुंबई अशी पहिली विमानसेवा सुरू होण्याबद्दल अतिशय वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यानंतर लगेचच 'उडान' योजनेअंतर्गत हैदराबाद,बेंगलोर,नवी दिल्ली,गोवा व तिरुपती या ठिकाणी विमानसेवा डिसेंबर पर्यंत चालू होईल. 





त्यासाठी सोलापूर विचार मंच तर्फे तब्बल दहा विमान कंपन्यांना सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्यातील चार विमान कंपन्यांनी दीड महिन्यापूर्वीच उत्सुकता दर्शवलेली आहे. प्रशासन सुद्धा त्यांच्या पातळीवर याबाबतीत प्रयत्न करीत आहे. 

सिद्धेश्वर कारखान्याच्या अनधिकृत को-जनरेशन चिमणीचा अडथळा दूर करण्यासाठी सोलापूर विचार मंचने गेली साडेचार वर्ष न्यायालयीन व सर्व प्रशासकीय लढाई देऊन १५ जून २०२३ रोजी चिमणीचा अडसर दूर केला व त्यानंतर या होटगी रोड विमानतळाचे मोठ्या प्रमाणात व अत्याधुनिक पद्धतीने विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले. 
यामध्ये असंख्य अडथळ्यांना पार करण्यामध्ये अखेर सोलापूर विचार मंचच्या जनरेट्याला आज खरे यश मिळाले आहे परंतु पहिली विमानसेवा सुरू होईपर्यंत हे सातत्याने प्रयत्न सुरूच राहतील असे सोलापूर विचार मंचचे डॉ.संदीप आडके यांनी दैनिक सूर्योदयाची बोलताना म्हणाले सांगितले. आज खऱ्या अर्थाने सोलापूरच्या विकासाची दारे पुन्हा एकदा जगासाठी खुली झालेली आहेत व आता सोलापूरचे गतवैभव लवकरच प्राप्त होईल.