Ticker

6/recent/ticker-posts

धमाका करणार.....लोकप्रिय पंचनामा लवकरच सुरू होणार


"मला नाही अब्रू मी कशाला घाबरू" अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पंचनामा करणार

सोलापूर : दि.२९ (एमडी२४न्यूज) सोलापूर शहरातील एमडी२४न्युज  www.md24news.co.in  या वेबपोर्टल मार्फत सोलापूर शहरातील आरोग्य खात्याचा पंचनामा करण्यात आला होता. आरोग्य खात्याचा पंचनामा चाळीस दिवस चालविण्यात आला. सोलापूर आणि राज्यातील वाचकांनी पंचनाम्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता. चाळीस भागाच्या माध्यमातून आरोग्य खात्याला शिस्त लावण्याचा काम या पंचनाम्याने केला. पंचनामा बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले,मारहाण केली,आणि आता खोटे गुन्हे दाखल करून तडीपार देखील केले. परंतु आम्ही घाबरणार नाही,उलट आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यानी आमची ताकद वाढवली आहे. काही दिवसांची विश्रांती घेऊन पंचनामा भाग -२ या मथळ्याखाली पुन्हा एकदा नव्या जोमाने भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणि महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला जाणार आहे. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू या म्हणी प्रमाणे काम करत भ्रष्टाचार करणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याना आम्ही घरी बसविण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.





मड्याचा ताळू वरच लोणी खाणाऱ्यानो याद राखा,ही लढाई भ्रष्टाचाराविरोधात आहे. सोलापूर करांची लूट थांबविण्यासाठी आम्ही लढत आहोत,यात आमचं जीव गेला तरी चालेल,परंतु सत्य परिस्थिती मांडून तुमची हकालपट्टी जरूर करणार. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याना वाटत असेल,पोलिसांशी संगनमत करून,दबावतंत्राचा वापर करून कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा करून जाणार,पण आम्ही सोलापूरकर,आणि सोलापूरची निर्भीड मीडिया हे होऊ देणार नाही.

बीडच्या भूमीपुत्राने आरोग्य खात्यात अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यात मोठी अफरातफर करत कोट्यावधी रुपये जमा केले आहेत. बीडच्या भूमीपुत्राने आरोग्य मंत्र्याच्या हाताला धरून मोठंमोठे कारनामे केले आहेत. लवकरच विधानसभा निवडणूका होतील,आणि तख्तापलट होणार आहे,त्यावेळी बीडच्या भूमीपुत्राला पळायला देखील जागा राहणार नाही. भ्रष्टाचार करून जितकी संपत्ती गोळा केलीय,ती सर्व आयकर विभाग,ईडी,लाचलुचपत विभागाकडे जमा करावी लागणार आहे.

पती पत्नी एकत्रिकरणाच्या नावाखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य खात्यात हैदोस घालणाऱ्या दाम्पत्याला पंचनामा भाग-२ मार्फत सळो की पळो करून सोडले जाणार आहे. आरोग्य खात्यातील डॉक्टर पती पत्नीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जो गोरखधंदा सुरू केला आहे,त्याचा पर्दाफाश केला जाणार आहे. सातारा,रायगड,ठाणे ,अलिबाग,पालघर आदी भागात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल पंचनामा भाग-२मद्धे करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा आरोग्य खात्यात अधिकारी हे मला नाही अब्रू मी कशाला घाबरू असे वागत आहेत.