Ticker

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत...


सोलापूर : दि.२९ (प्रतिनिधी)  महानगरपालिकेच्या वतीने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,सभागृह येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करणेत आले आहे. यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी लोक आदालातासाठी उपस्थित असलेले पी.पी.पेटकर (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर) यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,रेवण पाटील (सहाय्यक लोक अभिरक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर,नगर सचिव प्रवीण दंतकाळे तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सदर लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे ८५०० व भुमी व मालमत्ता विभागाकडील १६०० थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांची व गाळेधारकांची प्रकरणे तडजोडी करीता दाखल करण्यात आलेली होते. दाखल प्रकरणनिहाय मा. सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर यांचेमार्फत संबंधित मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच आज महापालिकेच्या परिसरामध्ये लोक आदालतचे आयोजन करण्यात आल्यामुळे या परिसरात सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या सवलतीचा लाभ घेतला.




 
यावेळी मालमत्ता कर विभागातील इतक्या व्यक्तींनी एकूण मिळकतदार - १२३४ एकूण वसूल झालेलीअसून इतके रक्कम ५,२८,३२,८५२/ सवलतीचा लाभ घेतला आहे. तसेच भूमी मालमत्ताकडील १६०० पैकी ५६७ सहभाग घेतला असून ६,९५,४३४२५ इतकी रक्कम जमा झाली आहे.लोक अदालतमध्ये मिळकतदारांच्या धकबाकीतील नोटीस फि, वॉरंट फि व शास्ती ची जी रक्कम आहे त्यामधील ५०% रक्कम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची "ड" प्रकरण ८ कराधान नियमातील नियम ५१ नुसार सुट म्हणून देण्यात आले आहे. सबब जास्तीत जास्त् मिळकतदारांनी सदर सवलतीचा लाभ आयोजित लोक अदालत च्या माध्यमातून देण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिले. तसेच ज्या मिळकतदारांना नोटीसा प्राप्त झाल्या नाहीत असे मिळकतदार ५०% शास्ती माफिचा लाभ मिळकतदारांनीही देण्यात आले आहे.