Ticker

6/recent/ticker-posts

फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयातून एकास अटकपूर्व जामीन मंजूर


सोलापूर : दि.२६ (एमडी२४न्यूज)  प्रत्येकी दहा लाख कर्जाचे आमिष दाखवून दहा व्यक्तींची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयातून  एकास अटकपूर्व जामीन मंजूर. प्रत्येकी १० लाख बिन परतावा कर्ज मंजूर करून देतो व त्याकरिता १० लोकांचा एक गट तयार करून बिन परतावा कर्ज मंजूर करून देतो तसेच त्या अमिषाला बळी पडून सदर प्रकरणातील फिर्यादी किरण माणिक जाधव व त्यांच्या नात्यातील ९ लोकांची आरोपी भारत जाधव यांच्या सांगण्यावरून व त्यावर विश्वास ठेवून यातील सर्वांनी प्रत्येकी २ लाख ५० हजार कर्ज मंजूरची रक्कम वेळोवेळी आरोपी भारत माणिक जाधव यांच्याकडे सुपूर्द केली होती. अशा आशियाची फिर्याद सलगर वस्ती पोलीस ठाणे येथील  भा.द.वी कलम ४०६,४२० प्रमाणे सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


यातील थोडक्यात हाकिकत आरोपी यांनी सुमारे ‌१५ वर्षांपूर्वी यातील फिर्यादी व त्यांच्या नात्यातील लोकांना वसंतराव नाईक महामंडळातून कर्ज मंजूर करून दिले होते. आरोपीने फिर्यादी व त्याच्या नातेवाइकांसह परत २०२२ मध्ये स्वतःच्या घरी बोलावून मी तुम्हास प्रत्येकी बिन परतावा कर्ज मंजूर करून देतो व त्यास लागणारा खर्च तुम्ही जमा करा आणि लवकरात लवकर तुम्हाला प्रत्येकी १० लाख रुपये बिन परतावा कर्ज म्हणून मिळतील अशी हमी आरोपीने यांनी फिर्यादीस व त्याच्या नातेविकांना दिली होती. कर्ज मंजुरीसाठी २ लाख ५० हजार रुपये देऊन सुद्धा कर्ज मंजूर न झाल्याने यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांनी आरोपीस वारंवार विचारल्यास त्यांनी उत्तर दिले नव्हते. तदनंतर आरोपीने कर्ज मंजूर न करता घेतलेल्या रकमेपोटी सुमारे २५ लाख रुपयांचा चेक ही फिर्यादीस दिला होता आणि तुम्ही तो चेक बँकेत टाकू नका मी लवकरच तुमचे कर्ज मंजूर करून देतो नाहीतर २५ लाख रुपये परत देतो असे म्हणून कर्जही मंजूर करून ही दिले नाही व दिलेली रक्कम परत ही केली नाही असा आरोप फिर्यादीने आरोपी विरुद्ध केला होता. तसेच आरोपींनी फिर्यादीचे व त्याच्या नात्यातील लोकांचे विश्वास संपादन करून फसवणूक केली असल्याची फिर्याद संबंधित पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. 

संशयित आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.निलेश कट्टीमनी,ॲड.वैभव बोंगे,ॲड.रोहीत थोरात,ॲड.औंकार फडतरे यांनी काम पाहिले.