Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार म्हणजे बळीचा बकरा;सत्य बाहेर काढण्याच बक्षीस म्हणजे तडीपार

सैफन शेखच पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर  धरणे आंदोलन

तुम्हाला काय वाटतंय आम्ही गप्प बसणार?आत्ता तर सुरुवात झालीय

सोलापूर : दि.२५ (एमडी२४न्यूज) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. या चौथ्या स्तंभाला बळीचा बकरा करून भ्रष्टाचार करत स्वतःची झोळी भरण्यासाठी विविध उपाय अधिकाऱ्यांना सुचत आहेत.सोलापूर शहरातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी असाच प्रयत्न करणाऱ्या सैफन शेख यांना येथील स्थानिक प्रशासनाने अनोखे बक्षीस दिले. सोलापूर आणि धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातून तडीपार. तडीपारीच्या आदेशाचा तंतोतंत पालन करत सैफन शेख यांनी पुणे येथील विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. एका www.md24news.co.in वेब पोर्टल आणि युट्युब मार्फत बातमीदारी करणाऱ्या सैफन शेख यांचा धसका इतका घेतला की,भ्रष्टाचाऱ्यानी संगनमत करत,पोलिसांची दिशाभूल करत तडीपार करायला लावले.





सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही,या वाक्याचा बोध घेत,सैफन शेख यांनी पुन्हा एकदा जोमाने संघर्ष सुरू केला आहे.सोलापुरातील मौलाली चौक परिसरात असलेले संस्मरण उद्यान(आजचे मंगल कार्यालय),सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सुरू असलेला भ्रष्टाचार,मनपा आरोग्य अधिकारी पदी बेकायदेशीरपणे विराजमान झालेल्या आरोग्य अधिकारी या सर्वांविरोधात पुण्यातील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करून नव्याने लढा सुरू केला आहे.तडीपार करून उलट चांगलंच झाले,असेच म्हणण्यास काही हरकत नाही. सोलापुरातील भ्रष्टाचार आता,विभागीय कार्यालय,मुंबईतील मंत्रालयात पर्यंत पोहचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची संपूर्ण तयारी केली जात आहे.