Ticker

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी ते केम एस:टी बस सेवा सुरु आर पी आय च्या प्रयत्नाला यश


सोलापूर : दि.२२ (प्रतिनिधी) माढा तालुक्यातील उपळवटे येथील आर पी आय चे माढा तालुका उपाध्यक्ष अभिमान गायकवाड यांच्या प्रयत्नांना आले यश उपळवटे येथील टेंभुर्णी केम ही एसटी बस सेवा अनेक दिवसापासून बस बंद असल्याने नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते या गोष्टीकडे कोणाचे लक्ष नसल्याने हे काम त्यांनी हाती घेतले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे त्यामुळे आर पी आय चे अभिमान गायकवाड यांचे उपळवटे सह तालुक्यामधून कौतुक होत आहे. 

टेंभूर्णी ते केम एस:टी बस सेवा - बरेच दिवसापासून बंद होती कन्हेरगाव दहिवली उपळवटे येथील नागरिकांची व विद्यार्थ्यांचीही होत होती गैरसोय मागील चार दिवसापूर्वी आर पी आय चे माढा तालुका युवक उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच उपळवटे अभिमान गायकवाड यांनी कुर्डूवाडी आगार प्रमुख येथे निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेऊन टेंभुर्णी ते केम एस:टी बस सेवा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांना दवाखान्यात व इतर कामासाठी जाण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सोय झाले आहे  सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजता ची ही बस सेवा चालू झाल्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे टेंभुर्णी केम एस टी बस सेवा बंद असल्याने होणारी गैरसोय आता दूर झाली आहे.