Ticker

6/recent/ticker-posts

८ वा वर्धापण दिन स्मार्ट सिटी मिशन...


सोलापूर : दि.२३ (एमडी24न्यूज)  पंतप्रधान यांनी स्मार्ट सिटी मिशन घोषणा करण्यात आली होती. त्या स्मार्ट सिटी मिशनला ८ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल वर्धापण दिनानिमित्त देशभरातील १०० स्मार्ट सिटीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याअनुषंगाने आज सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.वतीने पत्रकार परिषद अयोजन करण्यात आले असून या पत्रकार परिषदेस महापालिकेच्या आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल तेली-उगले,नगर अभियंता लक्ष्मण चलवादी,मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे आदि मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर शहराचे स्मार्ट सिटी मिशनमध्ये निवड झाल्यावर - सोलापूर शहरातील पायाभूत सोयी सुविधा सक्षम करण्याच्या हेतुने सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.ची स्थापना दि.२३.०३.२०१६ रोजी झाली असून आजपर्यंत स्मार्ट सिटी योजने करिता र.रु. १६९४ कोटी रुपयांची कामे हाती घेतले असून रु.६०६ कोटीची ४२ कामे पुर्ण झाले आहेत. १०३७ कोटी रुपये ६ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्यात प्रामुख्याने ८९५ कोटीच्या उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचा समावेश आहे.

सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.ने आजपावेते विविध विकासकामे हाती घेतले आहेत - त्यामध्ये रस्ते सुधारणा,पाणी पुरवठा सुधारणा,घन कचरा व्यावस्थापन, पुरातन वारसा इमारतीचे पुर्नरुज्जीवन,सौर उर्जा प्रकल्प, सोलापूर शहरातील १४ स्मशानभूमी,प्रदर्शनीय जागाचा विकास,ICCC (कमांड ॲन्ड कन्ट्रोल सेंटर,स्काडा पाणी पुरवठा प्रकल्प यातील घटक प्रकल्पाचा समावेश आहे.

१. पाणी पुरवठा सुधारणा - उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी १७० MLD:- ८९५ कोटी रुपये.

खर्चाचा प्रकल्प - जुन २०२३ रोजी कार्यारंभ आदेश स्मार्ट सिटी - २५० कोटी व एनटीपीसी २५० कोटी व राज्य शासन ३९५ कोटी -सदरचे काम प्रगतीपथावर आहे.

वॉटर ऑडीट व स्काडा प्रणाली : पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने पाणी पुरवठा नियोजन करण्यासाठी वॉटर ऑडीट करण्यात आलेला आहे. त्यानुसार स्काडा प्रणालीद्वारे संगणकीकृत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था यासाठी र.रु.८० कोटी पर्यंत खर्च करण्यात येत आहे.

ws आणि sw प्रणालीमध्ये सुधारणा - शहरातील पाणी पुरवठा सुधारणा आणि सिव्हरेज सिस्टीम सुधारण्यासाठी शहरातील खुप जुन्या पाईप लाईन्स बदलण्यात आल्या साधारण ९० किमी पाणी पाईप लाईन आणि ८५ किमी सिव्हर पाईप लाईन बदलण्यात आली. त्यामुळे पाणी पुरवठा सुधारणा झालेले आहे. त्याचबरोबर सदर ठिकाणी रस्ते देखील दुरुस्ती करण्यात आले आहेत.

२. ICCC (कमांड अँन्ड कन्ट्रोल सेंटर) - शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपुर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणेकामी केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या उभारणी करण्यात येत असून त्यामध्ये शहरातील सुरक्षा व्यावस्था स्काडा प्रणालीचे नियंत्रण ऑटोमॉटीक ट्रॉफीक सिग्नल,ई-चलन सिसटीम इत्यादी कामे प्रगतीपथावर आहेत.

३. रस्ते विकास - १०.८ किमी रस्ता विकासकामे : शहरातील सिध्देश्वर मंदिराकडे येणारे रस्ते,नंदिकोल मिरवणुक मार्ग हे पहिल्या टप्प्यात सुमारे १०.८ कि.मी चे एकुण १२ रस्ते विकसित करणेत येणार आहेत. कांही ठिकाणी सिमेट कॉक्रीट व कांही ठिकाणी डांबरी रस्ते करणेत आलेले आहेत. या ठिकाणी प्रथमता पाण्याची पाईपलाईन व ड्रेनेज लाईन,पावसाळी गटर इत्यादीचे कामे पुर्ण झालेले आहेत.

स्मार्ट रोड फेज-२- पायलट प्रोजेक्ट म्हणुन शहरातील रंगभवन चौक ते डफरीन चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हा सुमारे १.१ कि.मी चा रस्ता रिडिझाईन करणेत आले आहे. या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजुस पाण्याची पाईपलाईन,ड्रेनेज लाईन,पावसाळी गटर,भुमीगत विद्युत तारा,टेलिफोन वायर इ.यूटिलिटी करीता स्वतंत्र डक्ट तयार करणेत आले आहे. दोन्ही बाजुस फुटपाथ पादचा-यांकरीता तयार करणेत आला आहे. 

४. प्रदर्शनीय जागा व पुरातन वास्तु - लक्ष्मी मार्केट हेरिटेज स्ट्रक्चरचा पुनरुज्जीवन : १०० वर्षापूर्वीचे लक्ष्मी मार्केट नुतनीकरण करणेच डिझाईन तयार करणेत आलेले आहे. त्याठिकाणी १००० ओटे व मसाला विक्री करण्याकरिता १०० गाळे बांधण्यात आली आहे.

हेरिटेज वास्तूंचे पुनरुज्जीवन (इंद्र भवन इमारत) : शहरातील एतिहासिक वास्तु असलेले मनपाची इंद्रभुवन इमारतीचे पुर्नरुज्जीवन करणेचे काम स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुर्ण झालेले आहे. 
सिद्धेश्वर तलाव विकास : सदर कामांतर्गत सिध्देश्वर तलावाच्या बाजुने पीसीसी काम पुर्ण झालेले आहे. तर १२०० मीटर इतके येलो कोटा फ्लोरींगचे,ब्लॅक बसाल्ट बसविणेचे काम पुर्ण झालेले आहे. तसेच सदर तलावाच्या बाजुने १४५० मीटर इतके पीसीसी वर्क झालेले आहे. तलावाच्या बाजुने पावसाळी गटार व ड्रेनेज लाईन टाकणेचे काम पुर्ण झालेले आहे. सदर ठिकाणी अनोखे असे विद्युत खांब बसविणेचे काम पुर्ण झाले आहे. सदरचे काम पुर्ण झालेले आहे.

सिद्धेश्वर तलाव सुधारणा : सिध्देश्वर तलावाचे पुर्नज्जीवन करणे सदर प्रकल्पाअंतर्गत सिध्देश्वर तलावाची स्वच्छता व साफसफाई, तलावाच्या सभोवताली जमा होणा-या कच-याचे निर्मुलन करणे, तलावातील गाळ व तण काढणे व तलाव पुर्नरुज्जीवीत करणे इत्यादी कामे अंर्तभूत आहेत. सदर काम पूर्ण झालेले आहे. 
लाईट अँड साउंड शो सिद्धेश्वर तलाव : शहरातील सिध्देश्वर तलाव परिसरात नागरिकांकरीता संगीताच्या तालावर व कारंज्यावर आधारित लाईट अँड साऊंड शो पुर्ण झाले असून शहरातील नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

होम ग्राउंड नूतनीकरण : होम मैदान येथे सुधारणा करणे- शहरातील अत्यंत महत्वाचे असलेले मैदान है. धुळमुक्त करणेकरीता सभोवताली मोठे वृक्ष लावणेत आले असुन मैदानाच्या चारही बाजुने चेनलिक फेन्सींग मैदानास १२ मोठे गेट,वॉचमन केबिन,विद्युत दिवे व्यवस्था,लालमातीचा नॅचरल वॉकिंग ट्रॅक,पार्किंग व्यवस्था इ.कामे पुर्ण करणेत आली आहेत. सदरचे काम आजमितीस पुर्ण झालेले आहे.

हुतात्मा गार्डन फेज २ : हुतात्मा बाग-शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अस्तित्वात असलेल्या या बागेत लाल मातीचा वॉकिंग ट्रॅक,अस्तित्वातील फरशीचे ट्रॅकचे दुरुस्ती,संरक्षक भिर्तीची दुरुस्ती,लाईट व्यवस्था,प्रवेशद्वार,विविध झाडे लावणे, १:७ नागबावडी विहरीतील गाळ काढुन त्याचे पाणी बागेत पुरविणे, कारंजे तयार करणे इ.विविध सुधारणेची कामे पुर्ण झाली आहे. नागरिकांकरीता खुले करणेत आले आहे.

उद्यान विभाग : उद्यान विभाग (पासपोर्ट ऑफीस लगत) याठिकाणी अँडव्हेंचर पार्क करणेत आलेले आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल, वॉकिंग ट्रॅक,दिव्याची व्यवस्था, प्रवेशद्वार,रेस्टॉरंट,नर्सरी लहान मुलांकरीता खेळण्याची साधने,ई-टॉयलेट इ.कामे करण्यात आले असून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

स्ट्रीट बाजार : स्ट्रीट बाजार या प्रकल्पा अंतर्गत रस्ते ड्रेनेजचा विकास स्ट्रॉम वॉटर लाईन,फुटपाथ व इलेक्ट्रीक काम इत्यादी कामे करण्यात आलेले आहे. सदर काम आजमितीस पूर्ण आहे. 
प्रदर्शनीय जागांचा विकास करणे : सिटी एक्झीबिशन सेंटर विष्णू मिल कंपाऊंड परिसरामध्ये सोलापूर शहरातील नागरिकांकरिता बहुउदेषिय प्रदर्शन केंद्र विकसित करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रदर्शन मैदान सभाकरिता भव्य स्टेज (सर्व सोईयुक्त) पब्लिक स्वच्छतागृह,स्टोर, ५० चार चाकी व १०० दुचाकी वाहनाकरिता वाहन तळ,संरक्षण भिंत,भव्य आकर्षक प्रवेशव्दार,अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन,वाटर लाईन, स्ट्रीट लाईटची व्यवस्था इत्यादी विकसित करण्यात आले आहे.

५. घनकचरा व्यवस्थापन - SWM_घंटा गाडी २.२ घ.मी. (६०) व ३.२ घ.मी. (६०) : सोलापूर महनगरपालिकेकडे पुर्वी १०५ घंटागाड्या उपलब्ध होत्या. घनकचरा व्यवस्थापन करणेकरीता घंटागाड्याची संख्या वाढवणे आवश्यक होते. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेच्या निधीतुन टाटा कंपनीकडुन २.२ घ.मी. क्षमतेच्या ६० गाड्या व ३.२ घ.मी क्षमतेच्या १३० गाड्या खरेदी करणेत येउन त्यांचा वापर शहरामंध्ये चालु झाला आहे. यामुळे घंटागाड्याची संख्या वाढली असुन प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी घंटागाडी जात असुन रस्त्यावर अथवा कचराकुंडी मध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये घंटागाडी दररोज जाणेकरीता त्याचा रुटमॅप करणेत आलेला आहे. सदर घंटागाडी मध्ये ओला व सुका कचरा साठविणेकरीता दोन स्वतंत्र कप्पे असुन त्या सर्व वाहनांवर जीपीएस ट्रैकिंग यंत्रणा बसविणेत आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक घंटागाडी कोठे, किती वेळ गेली. थांबली यांचे सर्व माहिती मनपाकडील घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये दररोज मिळत आहे. सदर एकुण १२० घंटागाडी खरेदी करीता सुमारे रु.७.११ कोटी इतका खर्च आलेला आहे.

ट्रान्सफर स्टेशन उपकरणे : ट्रान्स्फर स्टेशन मशिनरी खरेदी करणे घंटागाडीतुन कचरा गोळा केले नंतर तो ट्रान्स्फर स्टेशन या ठिकाणी ओला व सुखा विलगिकरण करून आणुन तेथे मोठ्या आरसी वाहनात कि जे २० मेट्रिक टन हुक लोडर व २५ टन जेव्हीडब्लु वाहनतूनकचराडेपू पोहचवल जाते. सदरचे वाहन दिल्ली येथील टीपीएस इन्फ्रस्ट्रक्चर या कंपनीकडुन घेणेत आलेली आहे. ट्रान्सफर स्टेशन सिव्हिल : शहरातील १) एचएसआर टाकी जुळे सोलापूर २) लेप्रसी कॉलनी ३) इंद्रधनु वसाहत रेल्वे लाईन बाजुस ४) रुपाभवानी चौक या चार ठिकाणी ट्रान्स्फर स्टेशन करणेत आलेली आहे. शहरातील घरोघरी घंटागाडी द्वारे कचरा गोळा केले नंतर या ट्रान्स्फर स्टेशन मध्ये आणुन तो मोठ्या आरसी वाहनामध्ये शिफ्ट केला जातो. 

डस्टबिन फेज १ : डस्टबीन खरेदी करणे- १००% घनकचरा व्यवस्थापन करण्याचा एक प्रयत्न म्हणुन शहरातील प्रत्येक घरामध्ये ज्यांचे कडे मनपा मिळकत कर क्रमांक असेल अशा नागरिकांना प्रथम प्राधान्याने ओला व सुका कचरा गोळा करणे करीता १० लिटर क्षमतेचे दोन ( हिरवा व निळा) डस्टबिन मोफत वाटण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात एक लाख डस्टबिन खरेदी करणेत आले असुन त्याचे वाटप शहरात जनजागृती निर्माण करणेकामी नियुक्त करणेत आलेली कंपनी में मिटकॉन कन्सलटन्सी यांचे मार्फत झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकुण एक लाख डस्टबिन नागपुर येथील नागपुर पॉलिफिल्मस या कंपनीकडुन याची खरेदी करणेत आलेली आहे. या करीता सुमारे र.रु.९८ लाख इतका खर्च आलेला आहे. आजमितीस पहिल्या टप्यातील १ लाख डस्ट बिनचे वाटप करणेत आलेले आहे.

डस्टबिन घरगुती फेज ०२: दुस-या टप्प्यात सोलापूर शहरासाठी ६६ हजार खरेदी करणेत आले आहे.आजमितीस दुसर्या टप्प्यातील डस्ट बिनचे वाटप करणेत आलेले आहे. सदरचे संपुर्ण डस्टबिनचे वाटप करणेचे काम पूर्ण झालेले आहे.

SWM साठी IEC - नागरिकांमध्ये जनजागृती करणे- लोकसहभागाचे महत्व लक्षात घेऊन शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करणेसाठी पुणे येथील मिटकॉन कन्स्लटन्सी या कंपनीस काम देणेत आले आहे. सदरचे मक्तेदार घंटागाड्यांचा रुट मॅपिंग करणे. शहरात ठिकठिकाणी जनजागृती करणे,मनपातील घनकचरा विभागातील कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे,IEC मटेरिअल तयार करणे,मनपास कचरामुक्त शहर करणेस मदत करणे इ.कामे केलेली आहेत.

सोलापूर नियोजन भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत - कामे पूर्ण झाल्याची माहिती सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल तेली-उगले यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिले.