Ticker

6/recent/ticker-posts

एनटीपीसी सोलापूरच्या वतीने 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला


आरोग्य आणि फिटनेसबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी,एनटीपीसी  सोलापूर येथे 21 जून 2023 रोजी सिद्धेश्वर विद्युत नगर टाऊनशिपच्या कम्युनिटी सेंटरमध्ये 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वर्षाची थीम “वसुधैव कुटुंबकम साठी योग”,म्हणजेच ‘एक विश्व-एक कुटुंब म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी योग’ याचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले. विजय गोयल, CGM, एनटीपीसी सोलापूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी तपन कुमार बंदोपाध्याय, GM(O&M), बिपुल कुमार मुखोपाध्याय, GM (FM),परिमल कुमार मिश्रा, GM (ऑपरेशन),संगीता गोयल,अध्यक्षा,सृजना महिला मंडळ,कर्मचारी,कुटुंबातील सदस्य, CISF जवान,लेडीज क्लबचे वरिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या सामाईक योग प्रोटोकॉलनुसार योग साधने,आसन आणि प्राणायाम योग साधना करण्यासाठी सर्वजण एकत्र जमले होते.