Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा . . .

     
१) मी ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
    
२) मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
    
३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
    
४) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही .
    
५) बुध्द हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय,असे मी मानतो . 
    
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही ; पिंडदान करणार नाही.
     
७) बुध्द धम्माच्या विरुध्द विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही.
     
८) कोणतेही  क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही.
     
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत,असे मी मानतो.
  
१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
  
११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  
१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.
   
१३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन,त्यांचे लालनपालन करीन.
   
१४) मी चोरी करणार नाही.
   
१५) मी खोटे बोलणार नाही.
   
१६) मी व्यभिचार करणार नाही.
   
१७) मी दारू पिणार नाही.
   
१८) मी प्रज्ञा,शील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्त्वाची सांगड घालून माझे जीवन चालवीन.
    
१९) माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुध्दाच्या धम्माचा स्वीकार करतो.
    
२०) बुध्द धम्म हा सधम्म आहे,अशी माझी खात्री पटलेली आहे.
    
२१) माझा नवा जन्म होत आहे,असे मी मानतो.
    
२२)  इत:पर मी बुध्दाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

सौजन्य - डॉ.बाबासाहेब आंबेडकर